दिल्लीतून राजधानी दिल्लीच्या सत्तर विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत साधारण बारा टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये सामान्य नागरिकांसह दिग्गज नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.