Mateen Patel ला कोणताही दिलासा नाही, मतीन पटेलच्या घरावर उद्याच कारवाई होण्याची शक्यता

निदा खानला राहण्यासाठी आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना औरंगाबाद खंडपीठाने कोणताही दिलासा दिलेला नाही. मतीन पटेल यांचे घर ऑफिस आणि निदा खानला आश्रय देण्यात आलेलं घर अनाधिकृत असल्याचं सांगत महानगरपालिकेने कारवाईबाबत नोटीस काढली होती. या विरोधात मतीन पटेलने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली मात्र खंडपीठाने मतीन पटेलला कोणताही दिलासा दिला नाही. सोबतच कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देणे बाबत देखील कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे महानगरपालिकेकडून अन अधिकृत बांधकामावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ