उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना आता मनसेतील प्रमुख नेत्यांनी मात्र नाराजीचा सूर आवळला आहे. मनसेतील काही प्रमुख नेत्यांनी या युतीला अभद्र युती अशी टीका केली.मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनोज चव्हाण यांनी या युतीला विरोध दर्शवलाय.दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि भाजपला बाजूला करण्याची अट घातल्यानंतर संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला टोला लगावलाय. फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल असं देशपांडे म्हणाले. दरम्यान अमेय खोपकर आणि मनोज चव्हाण यांच्या ट्वीटरवरील प्रतिक्रियेमुळे राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना युतीवर कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय.त्यामुळे आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंची अट मान्य करुन युती करणार का? आणि युतीवर मनसे नेत्यांची नाराजी दूर कशी करणार? हे पाहावं लागेल.