ईशान्य फ्रान्समध्ये एका सरावादरम्यान 2 विमानं एकमेकांवर आदळली,त्यानंतर विमानाचे तुकडे तुटलेल्या तारांसारखे एकामागून एक जमिनीवर पडताना दिसले. सेंट-डिझियर हवाई तळावरच्या आकाशात फ्रेंच लष्करी विमानं कवायती करताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय..आकाशात कवायती करत असताना दोन लष्करी विमाने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी हा भीषण अपघात घडलाय.