उत्तर प्रदेशाच्या आग्रामध्ये समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांच्या निवासस्थानाबाहेर करणी सेनेनं आंदोलन केलं, यावेळी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली, यात एक पोलीस निरीक्षक जखमी झाला, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत या सगळ्या आंदोलकांना पांगवलं,काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी संसदेत राणा संगा यांना गद्दार म्हटले होतं, आणि यावरूनच करणी सेना आक्रमक झाली, थेट बुलडोझर घेऊन रामजीलाल सुमन यांच्या घराबाहेर पोहोचली.