ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचं निधन झालंय. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची ओळख होती. प्रकृती बिघडल्यानं दोन दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते. आज आळंदीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्यानं दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असतानाच, त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.