श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पनीर आणि ॲनालॉग चीजबाबत एक लक्षवेधी मांडली होती.याबाबत केवळ राज्य सरकारनेच नाही तर केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. FSSAI ने ॲनालॉग पदार्थांबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. सोबतच FDA विभागात अधिकाऱ्यांची देखील वाढ करण्याची मागणी केली होती.त्यानुसार राज्य सरकारने FDA विभागात 196 अधिकारीची नियुक्ती केल्याची माहिती आमदार पाचपुते यांनी दिली. नागरिकांनी मोठ्या संख्येने FSSAI ला आपल्या हरकती आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन देखील त्यांनी केल आहे.