रायगड पालकमंत्री पदावरून सुरू असलेला संघर्ष आता वैयक्तिक हेवेदाव्यापर्यंत पोहोचलाय. सुनील तटकरे यांनी महाडच्या सभेत भरत गोगावले यांची नक्कल केली आहे आणि या नकलेवरून गोगावले यांची मुलगी शीतल गोगावले यांनी तटकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. टिश्यू पेपर वापरून फेकण्याची सवय आम्हाला कधीच नाही. गोगावलेच्या नॅपकिन मध्ये हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहेत असं शीतल गोगावले या म्हणालेल्या आहेत.