काश्मीर मधल्या पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अवघ्या देशाला सुन्न करणारा होता. आयुष्यात आनंदाचे चार क्षण वेचायला गेलेल्या कुटुंबांना आपल्या काळजाचे तुकडे डोळ्यासमोर तडफडताना पाहावे लागले. पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवाद्यांनी हे केलं म्हणून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केले. पण भारताच्या हद्दीत घुसून सुरक्षा व्यवस्था कमी असलेलं ठिकाण शोधून पर्यटकांना मारण्याची योजना तयार करणं दहशतवाद्यांना इतकी अचूक माहिती मिळाली कशी दुर्दैवानं त्या प्रश्नाचं उत्तर भारतामध्येच मिळालंय. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी देशभरात जी कारवाई केली आहे त्यामध्ये तब्बल नऊ जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात आणि या नऊ जणांवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. हे आपलेच म्हणून वावरणारे पण देशाचे गद्दार आहेत कोण? ते बघा.