दहशतवाद जगाचा दुश्मन असला तरी पाकिस्तानचा मात्र दोस्त आहे. दहशतवादाला पोहचणं हे पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकार यांचं जणू आद्य कर्तव्य पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यामध्ये दहशतवाद्यांचं जाळं पसरलंय आणि पाकिस्तानच्या भूमीवर पोहचलेले हे दहशतवादी जगभरात थैमान घालतात आणि याचा सगळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो तो पाकिस्तानचा शेजारी देश असलेल्या भारताला. गेल्या दोन तीन दशकामध्ये पाकिस्ताननं दहशतवाद हेच भारताविरोधातल्या आपल्या लढाईमधलं सगळ्यात मोठं हत्यार बनवलं.