लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद ५९ आणि पंचायत समिती ११८ जागांसाठीची मतमोजणी किल्ला परिसरात होणार आहे...या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपचा थेट सामना पाहायला मिळाला आहे....माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे....तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय... गुलाल कुणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी