Richest Country in The World : तुम्ही उन्हाळ्यात एखाद्या देशाच्या रस्त्यांवर चालत आहात आणि अचानक तुमच्या पायाखालून थंड हवा यायला लागते. ऐकायला जरी चित्रपटासारखं वाटत असलं, तरी ही गोष्ट खरी आहे. कतारमधील दोहा शहरातून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सांगतो की Souq Waqif या बाजाराच्या गल्ल्यांमध्ये जमिनीखालून एसीची थंड हवा येते. तो म्हणतो, 'मला वाटलं हवामान बदललंय, पण प्रत्यक्षात ती थंड हवा जमिनीखाली लावलेल्या एसीमधून येत होती.'
कतार जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक मानला जातो आणि या व्हिडीओने त्यांच्या आलिशान जीवनशैलीचा आणखी एक पुरावा दिला आहे. Souq Waqif हे दोहा येथील एक ऐतिहासिक बाजार आहे, जिथे पर्यटक दिवसरात्र फिरत असतात. उष्ण हवामानापासून आराम मिळावा म्हणून येथे गल्ल्यांच्या खाली अंडरग्राउंड कूलिंग सिस्टिम बसवण्यात आले आहे. म्हणजेच, चालताना प्रत्येक पावलाखाली थंड हवा जाणवते.
नक्की वाचा >> KBC Video: हुबेहुब चेहरा, तोच अंदाज अन्..'डुप्लिकेट'ला पाहून अमिताभ बच्चनही झाले थक्क, 'असा' प्रश्न विचारला..
कतारला जगातील चौथा श्रीमंत देश का म्हणतात?
कतारची अर्थव्यवस्था नैसर्गिक वायू आणि तेलावर आधारित आहे. प्रति व्यक्ती जीडीपीच्या बाबतीत हा जगातील चौथा सर्वात श्रीमंत देश मानला जातो. येथील नागरिकांसाठी आरोग्यसेवा, शिक्षण आणि जीवनमान अत्यंत उच्च दर्जाचे आहे. हा व्हायरल व्हिडीओ पुन्हा एकदा दाखवतो की, जेव्हा पैसा आणि बुद्धी एकत्र येतात, तेव्हा गरम वाळवंटही थंड होऊ शकतं.
नक्की वाचा >> Video : खडकाला धडक देताच हेलिकॉप्टर फुटबॉलसारखं समुद्रात कोसळलं! 5 जणांचा मृत्यू..संपूर्ण थरार कॅमेरात कैद
लोकांची रिअॅक्शन होतेय व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या भन्नाट व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलं, 'इथल्या गल्ल्याही लक्झरी आहेत, आमच्याकडे तर घरातसुद्धा थंडी नाही मिळत.' दुसऱ्या युजरने विनोदी शैलीत लिहिलं, 'कतारमधली एसीची हवा सुद्धा रॉयल वाटते.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world