Dancer Pranjal Dahiya Video Viral : हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री प्रांजल दहियाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.एका प्रेक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार एका शो दरम्यान घडला. त्यानंतर प्रांजलने त्या व्यक्तीला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिलं."काका तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी..",असं म्हणत प्रांजलने त्या व्यक्तीला चांगलच सुनावलं. लोकांनी मर्यादेत राहावं आणि कलाकारांचा आदर करावा,असाही सल्ला तिने यावेळी दिला. पण प्रांजलने एक व्हिडीओ शेअर करत अशा लोकांच्या मानसिकतेचा पर्दाफाश केला आहे.
प्रांजल दहियाने सोशल मीडियावर काय लिहिले?
प्रांजल दहियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे की, "तुमचा स्वभाव कितीही स्वच्छ असला तरी ते ते लोक तोच विचार करतात जे त्यांच्या घरात घडतं. प्रांजल दहिया हरियाणातील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. तिने हरियाणातील अनेक मोठ्या कलाकारांसोबत म्युझिक व्हिडिओ केले आहेत.नुकतच तिने तिच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. या शो दरम्यान स्टेजखाली असलेल्या प्रेक्षकांनी गैरवर्तन केल्याने प्रांजल संतापली आणि तिने त्या लोकांना खडेबोल सुनावले.
नक्की वाचा >> GK News : विमान किती उंचीपर्यंत उडू शकतं? त्यापेक्षा जास्त उंची गाठल्यास काय घडतं? 99 % लोकांना माहितच नाही
"काका..तुझ्या मुलीच्या वयाची आहे मी"
कॉन्सर्ट सुरू असताना प्रांजल म्हणाली, "थोडं सभ्यपणे वागा. कारण इथेही कोणाची तरी बहीण-मुलगी उभी आहे. काका मी तुझ्या मुलीच्या वयाची आहे. काळ्या जॅकेटवाले,तू थोडा कंट्रोलमध्ये राहा."प्रांजलने इतर प्रेक्षकांनाही आवाहन केले की, त्यांनी सहकार्य करावं."सर, तुम्ही थोडं स्टेजपासून दूर राहा.आमचा परफॉर्मन्स अजून बाकी आहे. मनमोकळं एन्जॉय करा,पण आम्हाला थोडं सहकार्यही करा.
"ताऊ तू...तेरी छोरी की उम्र की हूं मैं।"
— मुकेश ईशराण (@eshran75583) December 27, 2025
हरियाणवी कलाकार प्रांजल दहिया नाराज हुई।#paranjaldahiya pic.twitter.com/rLloXXKGUV
नक्की वाचा >> "मॅडम मर्डर झालाय...",पॉडकास्ट सुरु असतानाच धक्कादायक कॉल, ती महिला पोलीस अधिकारी कोण? Video व्हायरल
प्रांजल दहिया कोण आहे?
प्रांजल दहियाचे अनेक गाणे इंटरनेटवर सुपरहिट झाले आहेत.यामध्ये ‘52 गज का दामन',‘डीजे पे मटकूंगी', ‘भगत आदमी',‘जुत्ती काली',‘कबूतर',‘पायल रशिया की',‘बालम थानेदार',‘भागा आले' आणि ‘हेमा मालिनी'या गाण्यांचा समावेश आहे. तिच्या ‘कबूतर' आणि ‘बालम थानेदार चलावे जिप्सी' या गाण्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता .तसच या गाण्यांवर लाखो रील्सही बनल्या होत्या.डान्सर म्युझिक व्हिडिओसोबतच लाईव्ह स्टेज शो देखील करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world