Biker Passing Asiatic Lion Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका बाईकस्वार अत्यंत सहजपणे रस्त्याच्या कोपऱ्यात बसलेल्या सिंहाच्या शेजारून जातो. व्हिडिओ पाहिल्यावर असं लक्षात येतं की बाईकस्वार जंगलाच्या राजाला न घाबरता अक्षरश: दुर्लक्ष करून जातोय. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. गर्लफ्रेंड सोबत असेल तर सिंहाची काय भीती अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत.
नक्की वाचा - किस-किसको प्यार करूं ... बायको आणि 4 गर्लफ्रेंडसह एकाच सोसायटीत राहत होता तो, आणि एका दिवशी...
काकांनी सिंहाला थेट दुर्लक्ष केलं...
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका जंगलातून ही बाईक जाताना दिसत आहे. बाईकच्या मागे एक महिला बसली आहे. जी बाईकरची पत्नी असल्याची शक्यता आहे. हा बाईकस्वार सिंहाच्या शेजारून बाईकवरुन निघून जातो. त्याच्या चेहऱ्यावर अजिबातच भीतीही दिसत नाही. सिंहाला काही इज्जतच नाही का, असंही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एकाने म्हटलं आहे. अनेकांनी तर यामागे गर्लफ्रेंड पॉवर असल्याचं म्हटलं आहे.
असे व्हिडिओ पाहून लोकांच्या क्रिएटिव्हिटीला सीमा राहत नाही. एका युजरने लिहिलंय, गर्लफ्रेंडशी पंगा न घेणंच सुरक्षित आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, गजब बेइज्जती है... तिसऱ्या युजरची कमेंट अत्यंत रंजक आहे. त्याने लिहिलंय जर बायको सोबत असेल तर सिंहच काय डायनोसोरचीही पुरुष दोन हात करेल.
दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world