जाहिरात

Viral News: केवळ 3 वर्षांचा अनुभव आणि थेट 1.6 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी; तरुणाचे नशीब कसं चमकलं जाणून घ्या

Viral News: वैभव अग्रवाल नावाच्या एका सोशल मीडिया युजरने त्याच्या मित्राची यशोगाथा सांगणारी पोस्ट शेअर केलीय. त्याच्या मित्राला 1.6 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी कशी मिळाली? याची माहिती त्याने शेअर केलीय.

Viral News: केवळ 3 वर्षांचा अनुभव आणि थेट 1.6 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी; तरुणाचे नशीब कसं चमकलं जाणून घ्या
"Viral News: 1.6 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी कशी मिळाली?"

Viral News: टेक्नोलॉजीशी संबंधित कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणाची कहाणी ऐकून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसलाय. त्याला मिळालेले तगडं सॅलेरी पॅकेज हे त्यामागील कारण आहे. तीन वर्षांपूर्वी तो सॅमसंगम कंपनीध्ये वार्षिक 16 लाख रुपयांच्या सॅलेरी पॅकेजवर काम करत होता. आता सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (Senior Software Engineer) पदासाठी दिलेल्या मुलाखतीत त्याला वार्षिक 1.6 कोटी रुपयांच्या सॅलेरीचे पॅकेज ऑफर करण्यात आलंय. 

वैभव अग्रवालने त्याच्या मित्राची ही कहाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर शेअर केलीय, वैभव सध्या गुगल कंपनीमध्ये काम करतोय. वैभवने सांगितंल की, वर्ष 2022मध्ये त्याच्या मित्राचे शिक्षण पूर्ण झाले. आम्ही दोघं पूर्वी सॅमसंग कंपनीमध्ये काम करतो होतो, तेव्हा त्याचे पॅकेज 16 लाख रुपये होते. नुकतेच त्याने सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्याची निवड झाली आणि त्याला तब्बल 95 लाख रुपये LPA पॅकेजसह 1.6 कोटी रुपयांचे वार्षिक सॅलेरी पॅकेज मिळालंय.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कहाणीमुळे नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडालीय. केवळ तीन वर्षांचा अनुभव असतानाही इतके मोठे सॅलेरी पॅकेज मिळालं, यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. 

(नक्की वाचा: USA H-1B Visa: अमेरिकेला सोडा आता 'हे' 5 देश आहेत वर्क व्हिसासाठी चांगले पर्याय, मिळेल बक्कळ पगार)

कित्येक युजर्संनी वैभवला विचारलं की, त्याच्या मित्राने असे वेगळे नेमके काय केली की त्याला इतके मोठे यश मिळालं. काही लोकांनी मुलाखतीशी संबंधित टिप्सही मागितल्या. तर काही लोकांनी हा प्रकार आश्चर्यकारक असल्याचंही म्हटलं.   

चर्चा केवळी गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच नाही तर केवळ तीन वर्षांचा अनुभव आणि तिसऱ्या श्रेणीच्या महाविद्यालयातील शिक्षण याच गोष्टींच्या जोरावर तरुणाने मिळवलेल्या यशाचे लोक कौतुक करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com