जाहिरात

Bangladesh News: माशाला वाचवण्यासाठी युद्धनौका, हेलिकॉप्टर, सैन्य तैनात; बांगलादेशातील मिशन 'हिल्सा' चर्चेत

ढाका येथे प्रति किलोग्राम 1600 रूपयांपर्यंत किंमत असलेल्या या माशांवर बांगलादेशमधील लाखो लोक अवलंबून आहेत.

Bangladesh News: माशाला वाचवण्यासाठी युद्धनौका, हेलिकॉप्टर, सैन्य तैनात; बांगलादेशातील मिशन 'हिल्सा' चर्चेत
  • बांग्लादेश की सेना ने हिल्सा मछली को अवैध पकड़ से बचाने के लिए युद्धपोत और गश्ती हेलीकॉप्टर तैनात किए हैं
  • हिल्सा मछली अंडे देने के मौसम में बंगाल की खाड़ी से नदियों में लौटती है, जिसे तीन सप्ताह के लिए बैन किया गया
  • 4 अक्टूबर से 25 अक्टूबर तक मछली पकड़ने पर प्रतिबंध लगाया गया है और निगरानी चौबीसों घंटे की जा रही है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एखाद्या माशाच्या प्रजातीला वाचवण्यासाठी एखाद्या देशाने आपली सेना, युद्धनौका आणि पाळत ठेवणारी हेलिकॉप्टर तैनात करण्याची ही कदाचित पहिलीच घटना असेल. बांगलादेशच्या नौदलाने 'हिल्सा' नावाच्या आपल्या राष्ट्रीय माशाला अंडी देण्याच्या हंगामात अवैध मासेमारीपासून वाचवण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे.

AFP च्या अहवालानुसार, हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा असून, तो भारतातील पश्चिम बंगालमध्येही खूप लोकप्रिय आहे. अंडी घालण्यासाठी हा मासा दरवर्षी बंगालच्या खाडीतून नद्यांमध्ये परत येतो. बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी 4 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान, म्हणजेच तीन आठवड्यांसाठी, अंडी देणाऱ्या या क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

बांगलादेशच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सने दिलेल्या निवेदनानुसार, ही बंदी कठोरपणे लागू करण्यासाठी आणि माशांचे संरक्षण करण्यासाठी 17 युद्धनौका आणि गस्ती हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. खोल समुद्रात स्थानिक आणि परदेशी मच्छिमारांना घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी युद्धनौका आणि अत्याधुनिक सागरी गस्ती हेलिकॉप्टर 24 तास पाळत ठेवून आहेत," असे निवेदनात म्हटले आहे.

(नक्की वाचा-  Bengaluru Auto Driver: 5 कोटींची 2 घरं, लाखोंचं भाडं, AI स्टार्टअप फाऊंडर… बंगळुरूचा रिक्षावाला Viral)

माशांच्या संख्येवर परिणाम

ढाका येथे प्रति किलोग्राम 1600 रूपयांपर्यंत किंमत असलेल्या या माशांवर बांगलादेशमधील लाखो लोक अवलंबून आहेत. वाढत्या मागणीमुळे होणारी अति मासेमारी माशांच्या संख्येसाठी धोकादायक ठरत आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे संकटात असलेल्या पर्यावरणाचे नुकसान माशांच्या संख्येवर परिणाम करत आहे.

(नक्की वाचा : Railway News: प्रवासी 6 तास बाथरूममध्ये; रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला, समोर जे दिसलं ते पाहून सर्वच थक्क)

सरकारने बंदीच्या काळात उपजीविका गमावलेल्या प्रत्येक मच्छीमार कुटुंबाला भरपाई म्हणून 25 किलोग्राम तांदूळ देण्याचे ठरवले आहे. मात्र, काही मच्छिमारांच्या मते ही मदत पुरेशी नाही. या तीन आठवड्यांमध्ये आमच्याकडे जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसल्याने हे दिवस खूप कठीण आहेत."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com