जगावर युद्धाचं सावट, बाजारात मंदीची लाट...

जाहिरात
Read Time: 2 mins
जगावर युद्धाचं सावट, बाजारात मंदीची लाट...
तेहरान:

इस्राएलने इराणवर केलेल्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याच्या बातम्यांनी जगभरातील बाजारांमध्ये हाहाकार उडाला आहे. अमेरिकेच्या वायदा बाजाराचा निर्देशांक डाऊ फ्युचर्स 400 अंकांनी घसरला आहे. अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण इस्रायली गुप्तहेरांनी इराणमध्ये घुसून हल्ला चढवल्याची माहिती मिळते आहे. आता जर पुन्हा एकदा इराणने उत्तर दिलं आणि रशिया आणि चीनने फक्त पाठिंबा दिला तर मात्र परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. इस्राएलने हल्ला करु नये यासाठी अमेरिकेनं प्रयत्न केला पण तो असफल ठरला आहे. आता आज पहाटे इराणमध्ये झालेल्या हल्ल्यानंतरही अमेरिका इस्रायलच्या पाठिंबा दिला तर जगावर मोठ्या युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. 

या जागतिक युद्धाचा विपरीत परिणाम शेअर बाजारांवर होणार आहेत. आज भारतीय बाजारात जबरदस्त पडझड होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात आज ट्रेडिंग करणं टाळावं असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. इराणमध्ये कोणताही क्षेपणास्त्र हल्ला झालेला नाही. इस्फहान शहराजवळ 3 ड्रोन दिसले होते जे इराणी एअर डिफेन्स सिस्टीमने पाडले. आता इस्फहान शहरात वातावरण शांत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. रुपयाने आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे. आज एका डॉलरचा भाव 83 रुपया 55 पैसे झाला आहे. याआधीहीची नीचांकी पातळी 83 रुपये 51 पैसे होता. हा नीचांक दोन दिवसांपूर्वी नोंदवण्यात आला होता.