जाहिरात
Story ProgressBack

Nvidia कंपनीचा नवा रेकॉर्ड, शर्यतीत अ‍ॅपलला टाकलं मागे

मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल कंपनीनंतर Nvidia कॉर्पोरेशनने मोठा रेकॉर्ड नोंदवला आहे. जाणून घ्या सविस्तर...

Read Time: 2 mins
Nvidia कंपनीचा नवा रेकॉर्ड,  शर्यतीत अ‍ॅपलला टाकलं मागे

Nvidia Share Price News: अ‍ॅपल कंपनीला मागे टाकून Nvidia कॉर्पोरेशन जगातील दुसरी सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी ठरली आहे. बुधवारी (5 जून 2024) Nvidia कंपनीच्या शेअर्संनी विक्रमी उच्चांक गाठला. या रेकॉर्डसह कंपनीच्या बाजार भांडवलामध्ये सुमारे 150 दशलक्ष डॉलर्स जोडले गेले आहेत आणि कंपनीचे मूल्यांकन 3 ट्रिलियन डॉलर अंकावर पोहोचले.

(नक्की वाचा: AI चॅटबॉट हिरावून घेणार तुमची नोकरी? ChatGPT 4oने शेअर केली भारतातील ही यादी)

Nvidiaच्या शेअरची किंमत

बुधवारी (5 जून 2024) Nvidiaच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन 1,224.40 डॉलरवर बंद झाले, ज्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल 3.012 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. यामुळे Nvidia 3 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करणारी तिसरी कंपनी ठरलीय. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल कंपनीच्या नावे या रेकॉर्डची नोंद आहे

(नक्की वाचा: Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर)

बुधवारच्या सत्रादरम्यान जगभरात सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी मायक्रोसॉफ्टचा भाव 1.91 टक्क्यांनी वाढला. मायक्रोसॉफ्ट कंपनी 3.14 ट्रिलियन डॉलरच्या बाजार मूल्यासह पहिल्या स्थानावर आहेत. तर अ‍ॅपलचे शेअर्स 0.78 टक्क्यांनी वाढले आणि त्यांचे बाजार मूल्य सुमारे 3.005 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले.

(नक्की वाचा: टेन्शन विसरा, फॉलो करा Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स)

Nvidiaने त्याचे लेटेस्ट स्टेलर रेव्हेन्यु फॉरकास्ट जारी केले तेव्हापासून 22मे पासून स्टॉकमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एकीकडे  Nvidia AI क्रांतीच्या लाटेवर स्वार होत असताना दुसरीकडे Apple iPhonesच्या मागणीत झालेली घट आणि कंपनीची जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ असणाऱ्या चीनमध्ये कडव्या स्पर्धेशी झुंज सुरू आहे. प्रोडक्ट व सर्व्हिसमध्ये AI फीचर उपलब्ध करून देण्याच्या घाईमध्ये अ‍ॅपल कंपनी तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या त्रुटींमुळे मागे पडत असल्याचे निरीक्षण काही गुंतवणूकदारांकडूनही नोंदवण्यात आले आहे.   

इंग्लंडमधून 100 टन सोनं येणार भारतात, RBI ने उचललं महत्वाचं पाऊल; कारण...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
बॉलिवूडच्या या सिनेमांची पाकिस्तानात हवा; टॉप 10 मध्ये 7 सिनेमांचा समावेश
Nvidia कंपनीचा नवा रेकॉर्ड,  शर्यतीत अ‍ॅपलला टाकलं मागे
what-is-white-phosphorus-that-israel-is-using-in-lebanon-and-gaza know-international-law-about-it
Next Article
हाडं वितळतात, 800 सेल्सियसपर्यंत वाढतं तापमान, काय आहे White Phosphorus ज्याचा इस्रायलनं केलाय वापर
;