जाहिरात
Story ProgressBack

मविआला किती जागा मिळणार? शरद पवारांनी आकडाच सांगितला

Read Time: 2 min
मविआला किती जागा मिळणार? शरद पवारांनी आकडाच सांगितला
सातारा:

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या विजयाचा दावा या तीनही टप्प्यात केला आहे. मात्र शरद पवारांनी त्यांच्या एक पाऊल पुढे जात महाविकास आघाडी किती जागा जिंकेल याचा आकडाच सांगितला आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे. तरी राज्यात अजून दोन टप्पे शिल्लक आहेत. त्या आधीच पवारांनी विजयाचा आकडा सांगितला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवार लोकसभा निवडणुकी निमित्ताने अनेक मतदार संघात जात आहेत. त्यांच्या सभांची मागणीही महाविकास आघाडीत होत आहे. ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो. राज्यातले वातावरण पाहीले तर ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी पोषक असल्याचा दावा शरद पवारांनी केला. शिवाय 30 ते 35 जागा महाविकास आघाडी जिंकेल असे ही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी यावेळी महायुतीला चितपट करेल असा दावाही त्यांनी केला आहे. 

हेही वाचा - 'तुम्ही तुमचं पुणे बघा, आम्ही बारामती बघतो' दादा दादांवर का भडकले?

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात भाजपला आपल्या पराभवाची चाहूल लागली असल्याचेही पवार म्हणाले. दरम्यान अजित पवारांवर अधिक बोलणे शरद पवारांनी टाळले आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याला उत्तर देण्याचेही त्यांनी टाळले. बारामती लोकसभेत पहिल्यांदाच पैसे वाटल्या बाबत त्यांनी खंत व्यक्त केली. या आधी असं कधी झाले नव्हते असेही ते म्हणाले. शिवाय पैसे वाटण्याचे  व्हिडीओ ही उपलब्ध आहेत असे सांगत निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी असेही म्हणाले. 

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination