जाहिरात

पुणे-पंढरपूर मार्गावरील कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, 3 जण जखमी

याबाबत मिळालेली माहितीनुसार, इंदापूर येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून राँगसाईडने निघाल्याने हा अपघात झाला.

पुणे-पंढरपूर मार्गावरील कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, 3 जण जखमी

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

पुणे-पंढरपूर मार्गावरील कार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  माळशिरत तालुक्यातील कारूंडे येथे पुलावर ही अपघाताची घटना घडली आहे. ठार झालेल्यामध्ये माय-लेकाचा देखील समावेश आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

याबाबत मिळालेली माहितीनुसार, इंदापूर येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून राँगसाईडने निघाल्याने हा अपघात झाला.

(नक्की वाचा- निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केल मग नदीत फेकले)

कार वेगाने निघाली होती. तर टेम्पो देखील समोरून वेगाने येत होता. मात्र राजशे शहा यांनी राँगसाईडने असलेल्या दोन्ही वाहनांचा समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. 

(नक्की वाचा- चेंबूरमध्ये भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू)

अपघातात राजेश अनिल शहा (वय 55), दुर्गेस शंकर घोरपडे (वय 28), कोमल विशाल काळे (वय 32), शिवराज विशाल काळे (वय 10) हे जागीच ठार झाले. तर या अपघातात आकाश दादा लोंढे (वय 25), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय 30), अश्विनी दूर्गेश घोरपडे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com