जाहिरात

अरविंद सावंत जिंकले, पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?

वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना चांगले मताधिक्य मिळाले. पण सर्वांच्या नजरा होत्या त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर.

अरविंद सावंत जिंकले,  पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?
मुंबई:

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीच्या सामना पाहायला मिळाला. ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे यांची शिवसेना अशी लढत या मतदारसंघात झाली. ठाकरेंच्या शिवसेनेने अरविंद सावंत यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. तर महायुतीकडून हा मतदारसंघ कोण लढणार यावरून शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता. सुरुवातीला अरविंद सावंत यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार असेल अशी चर्चा होती. मात्र आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उच्चभ्रू वस्ती, मंत्रालय ते प्रमुख शासकीय कार्यालय, राजकीय पक्षांची मुख्यालय, कॉर्पोरेट हब ते झोपडपट्टी बहुल भाग असा असणाऱ्या या मतदारसंघात मराठी, गुजराती मारवाडी आणि मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. अटीतटीची लढत असणाऱ्या या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारत अरविंद सावंत विजयी झाले. कुलाबा आणि मलबार हिल या मतदारसंघात यामिनी जाधव यांना लिड मिळाले. तर वरळी, शिवडी, मुंबादेवी, भायखळा या मतदारसंघात अरविंद सावंत यांना चांगले मताधिक्य मिळाले. पण सर्वांच्या नजरा होत्या त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर.

हेही वाचा -  भाजपने गुजरात जिंकले पण चर्चा मात्र काँग्रेसच्या 'त्या' एकाच उमेदवाराची

आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड? 

अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईतून 52 हजार 673 मतांनी विजयी नोंदवला. याच मतदार संघातच आदित्य ठाकरेंचा वरळी विधानसभा मतदारसंघही येतो. या मतदार संघातूनही अरविंद सावंत यांना लिड मिळालं. पण ते किती याची चर्चा सध्या सुरू आहे. वरळी विधानसभा मतदार संघातून अरविंद सावंत यांना एकूण 64 हजार 844 मते मिळाली. तर  यामिनी जाधव यांना 58 हजार 129 मते मिळाली. म्हणजे ठाकरेंच्या वरळीतून सावंत यांना अवघे 6 हजार 750 येवढेच मताधिक देता आले. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूकही याच मतदार संघातून लढणार आहेत. त्यामुळे ऐवढे कमी मताधिक्य हे ठाकरेंसाठी काळजीची बाब मानली जात आहे. 

हेही वाचा -  राष्ट्रवादीत मोठ्या घडमोडी, अजित पवारांना दणक्यावर दणके बसणार?

सर्वाधिक मताधिक्य कोणी दिलं? 

अरविंद सावंत यांना सर्वात कमी मताधिक्य हे आदित्य ठाकरेंच्या वळीतूनच मिळाले आहे. सहा विधानसभा मतदार संघा पैकी कुलाबा आणि मलबार हिल मतदार संघ सोडता चार मतदार संघात अरविंद सावंत हे आघाडीवर होते. त्यात सर्वाधिक मताधिक्य हे भायखळा आणि मुंबादेवी मतदार संघातून सावंत यांना मिळाले. या दोनही मतदार संघातून त्यांना जवळपास 40 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातू अरविंद सावंत 76,053 मते मिळाली तर  यामिनी जाधव यांना 59,150 मते मिळाली. भायखळा विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांच्या पारड्यात 86,833 तर यामिनी जाधव यांना 40,817 मते मिळाली.  मलबार हिल मधून  सावंत यांना 39,573 तर यामिनी जाधव यांना 87,860 मते मिळाली. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत 77,469 तर  यामिनी जाधव 36,690 मते मिळाली. कुलाब्यात अरविंद सावंत 48,913 तर  यामिनी जाधव यांना 58,645 मते मिळाली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
अरविंद सावंत जिंकले,  पण आदित्य ठाकरेंच्या वरळीत कितीचे लिड?
Badlapur physical assault case accused house vandalized by Villagers
Next Article
बदलापूरच्या नराधमाचे अवघ्या 24 वर्षात 3 लग्न; तिन्ही बायका गेल्या सोडून