
मनोज सातवी, पालघर
Vasai Crime News : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याने मानसिक तणाातून तरुणीने जीवन संपवल्याची घटना वसईमध्ये घडली आहे. रेवती उमेश निळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून याप्रकरणी तिचा प्रियकर आयुष राणा आणि त्याचे वडील अजय राणा यांना वसई पोलिसांनी अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तरुणीने लग्नाची विचारणा केली असता पुजारी असलेले आयुष्यचे वडील अजय राणा यांनी 'कुंडली जुळत नसल्याचे आणि तू खालच्या जातीची असल्याचे' कारण देत लग्नास विरोध केला. तर, प्रियकर आयुषने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यामुळे रेवतीने नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती वसई पोलिसांनी दिली आहे.
(नक्की वाचा- हळदही सुकली नव्हती... नवरदेवाने नवरीच्या मांडीवर जीव सोडला, मन सुन्न करणारी घटना!)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवती हिने मोठा भाऊ विनीत याला सांगितले की, तिचे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आयुष राणा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याने मला लग्नाचे आमिष देऊन माझ्यासोबत मागील चार वर्षांपासून वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्तापित केले होते. याबाबतची माहिती आयुषचे वडील अजय राणा आणि त्याची आई यांना सुद्धा होती.
आयुषचे वडील अजय हे पुजारी असल्याकारणाने रेवती त्यांच्याकडे जात असे. त्यांनी तिला दोघांचे लग्न लावून देण्यासाठी हातामध्ये घालण्यासाठी काळा दोरा दिला होता. तिच्या बॅगेत अनेकवेळा ठेवण्यासाठी राख देते असत. तसेच विधी करत असे. तिला लग्नासाठी आयुषचे वडील अजय व आयुषची आई यांनी होकार दिला होता. मात्र आयुष याला लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने रेवतीचा मोबाईल नंबर ब्लॉक करुन टाळाटाळ करु लागला.
(नक्की वाचा- UP News: अरेरे! 'तंदुरी रोटी'वरुन राडा, लग्नाच्या मंडपात 2 जणांचा जीव गेला)
त्यानंतर त्याचे वडील अजय राणा यांना लग्नाबाबत विचारणा केली असता, त्यांनी तुझी व आयुष यांची कुंडली जुळत नसुन तुझ्या कंडलीमध्ये मृत्यु योग आहे. तसेच तुझी जात देखील खालची असल्याने तुझ्याशी मी माझ्या मुलाचे लग्न लावू शकत नाही असं सांगितलं. या तणावातून रेवतीने रॅटकिलर उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखले केला असून अधिक तपास करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world