जाहिरात

Political News : सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश होणार की नाही? बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रम वाढला

भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या पक्षप्रवेशाची माहिती आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

Political News : सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश होणार की नाही? बावनकुळेंच्या वक्तव्याने संभ्रम वाढला

संजय तिवारी, नागपूर

Nashik News : शेकडो वाहने, हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सुधाकर बडगुजर सकाळी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या पक्षप्रवेशाची माहिती आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? 

भाजप पक्षप्रवेशाबद्दल विचारणा केली असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांचा एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते आणि त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम वाढला आहे.  एक वाजता भाजप पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची सुधाकर बडगुजर यांनी माहिती दिली आहे. मात्र प्रवेश सोहळा होणार की नाही? झाला तर बावनकुळे उपस्थित राहणार का ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 

(नक्की वाचा- सलीम कुत्तासोबत डान्स ते अंडरवर्ल्डशी संबंधाचा आरोप, भाजपमध्ये एन्ट्री करणारे सुधाकर बडगुजर कोण आहेत?)

बडगुजर यांच्या प्रवेशांना स्थानिकांचा विरोध

भाजपा आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. हिरे बडगुजर यांचा इतिहास सांगत त्यांच्यावर जोरदार आरोप केले. नारायण राणे यांना जेवण करताना अटक करण्यात आली होती. त्याचे तक्रारदार बडगुजर होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबतचा बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.  बडगुजरच्या मुलाने एकावर गोळीबार केला. त्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे लपवण्यासाठी भाजपामध्ये येत असतील, अशी टीका हिरे यांनी केली होती. 

(नक्की वाचा - स्थानिक नेत्यांचा विरोध डावलत सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार)

(कोण आहेत सुधारक बडगुजर, त्यांच्या भाजप प्रवेशाला का होतोय विरोध? 

मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारुन सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश ठरला होता. मोठ्या उत्साहत सुधाकर बडगुजर देखील मोठा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यापुढे स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे मोठा पेच निर्माण झालाय की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे विरोध डावलून बडगुजर यांना पक्षात सामील केले जाते की त्यांना नाराज करून वेटिंगवर ठेवले जाते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com