जाहिरात

Election News: लोणावळ्यात पेरू विक्रेती महिला निवडणुकीच्या रिंगणात; नगरसेवकपदाची लॉटरी लागणार?

Lonavala News: आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य यामुळे उजळलंय. पण राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

Election News: लोणावळ्यात पेरू विक्रेती महिला निवडणुकीच्या रिंगणात; नगरसेवकपदाची लॉटरी लागणार?

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते. अनेकांना खूप प्रयत्न करुनही पदरी निराशाच पडते. लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पहायला मिळतंय. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. 

आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य यामुळे उजळलंय. पण राजकारणाचा गंधही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. 

(नक्की वाचा- WhatsApp वापरणाऱ्यांनो सावधान! नेहमीची सवय आयुष्य उद्ध्वस्त करू शकते)

अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. त्यामुळे भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता प्रचार करत आहेत. तर  सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंतही पोहचत आहेत. 

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळवण्यापासून ते मतं मिळवण्यापर्यंत काय-काय करावं लागतं, हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहतोय. अशात फळ विक्रेत्या भाग्यश्री स्वतःचं नशीब आजमावत आहेत. तर खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत असून पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते. त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com