
डोंबिवली अमजद खान
माजी नगरसेविकेच्या पतीला स्वत:चे भविष्य बघण्याची हौस महागात पडली आहे. नगसेविकेच्या पतीचे नाव विजय गायकवाड असे आहे. त्याने भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला आपला हात दाखविला. ज्योतिषाने हात हातात घेतला. पण ज्योतिष सांगण्या ऐवजी त्यांना बांधून त्यांना त्या बोगस ज्योतिषाने लूटले आणि नंतर तो पसार झाला. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. इथच हे प्रकरण संपत नाही. तर या प्रकरणी जो खुलासा झाला आहे, तो ऐकल्यावर पोलिस देखील चक्रावून गेले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात विजय गायकवाड हे राहातात. त्यांची पत्नी सुनिता गायकवाड या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. विजय गायकवाड हे सतत आजारी असतात. आपण नेहमी आजारी का असतो? आपल्या बरोबर असे का घडते? याची नेहमी त्यांना चिंता असायची. त्यामुळे आपल्या भविष्यात काय असेल याचा विचार ते करायचे. त्यातून भविष्य जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठी ते एका ज्योतिषाला शोधत होते. त्यांचे मित्र गिरीश खैरे यांनी त्यांना मी एका ज्योतिषाला ओळखतो. त्याच्याशी भेट घालून देतो असे सांगितले.
ट्रेडिंग बातमी - अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?
गिरीश यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी विजय गायकवाड यांना ज्योतिषाकडे नेले. ज्योतिषाने गायकवाड यांना सोबत बसवून गिरीश यांना इथून निघा असे सांगितले. ज्योतिषाने सांगितल्यानंतर गिरीश त्या ठिकाणाहून तातडीने निघून गेले. थोड्या वेळात ज्योतिषाने विजय गायकवाड यांचा हात पाहण्यासाठी हात समोर करा असे सांगितले. गायकवाड यांनी हात समोर करताच त्यांचे दोन्ही हात दोरीने बांधले गेले. त्यानंतर तिथे अजून एक व्यक्ती आला. त्याने विजय गायकवाड यांना पकडून ठेवले.
त्याच्याकडील काही रोकड आणि मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर ते तिथून पसार झाले. त्यानंतर विजय गायकवाड यांनी कशीतरी आपली सूटका तिथून केली. नंतर ते मानपाडा पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती. विजय गायकवाड यांना दुसरा तिसरा कोणी नव्हे, तर त्यांचा 30 वर्षाचा जुना मित्र गिरीश खैरे यांनेच फसवले होते हे समोर आले. विजय गायकवाड यांची आजारी मानसिक स्थिती पाहून त्याने काही साथीदाराना तयार केले.
ट्रेडिंग बातमी - अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?
त्यातल्या एकाला ज्योतिषी बनविले. त्यासाठी कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात एक घर भाड्याने घेण्यात आले. त्याच घरात गिरीश विजय यांना घेवून गेला. नंतर तिथेच त्यांना लुटण्यात आले. ही माहिती समोर येताच विजय यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांच्या मित्रानेच त्यांना फसवविले आहे. या प्रकरणी गिरीश खैरे याला अटक करण्यात आली आहे. पोलिस अन्य दोघांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरिक्षक राम चोपडे यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world