जाहिरात

Pune News : पुण्यातील या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी; पोलीस कारवाईसाठी सज्ज

Pune Traffic Police : बांधकाम व्यावसायिक आणि डंपर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर वाहतूक बंदीचे नियोजन करण्यात आले आहे. 

Pune News : पुण्यातील या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी; पोलीस कारवाईसाठी सज्ज

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या समस्येवर वाहतूक पोलीस वेळोवळी उपाययोजना करत असतात. आता पुण्यातील काही रस्त्यांवर अवजड वाहनास पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. जर त्या रस्त्यांवर नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काही करवाई केली नाही आणि कामात हलगर्जीपणा दाखवला तर त्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर करवाई होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या सगळ्याची देखरेख सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.  मिक्सर वाहनांचा वापर फक्त रविवारी करता येणार आहे. बांधकाम व्यावसायिक आणि डंपर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर वाहतूक बंदीचे नियोजन करण्यात आले आहे. 

(नक्की वाचा-  Guillain Barre Syndrome: जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 173 वर)

पुण्यातील कोणते रस्ते अवजड वाहनांसाठी बंद? 

नगर रस्ता - विमाननगर चौक, शास्त्रीनगर चौक, पर्णकुटी चौक, बिशप शाळा, लोहगावपासून प्रवेश बंद. 
⁠गणेशखिंड रस्ता - ब्रेमेन चौक, औंध परिहार चौक, महादजी शिंदे पुलापासून प्रवेश बंद.
पाषाण रस्ता- शिवाजीपुलाच्या पुढे अभिमानश्री चौकापासून प्रवेश बंद.
⁠कर्वे रस्ता- कर्वे पुतळ्यापासून प्रवेश बंद.
⁠जुना पुणे-मुंबई रस्ता - पाटील इस्टेटपासून प्रवेश बंद. 
⁠बाणेर रस्ता - राधा चौकापासून प्रवेश बंद. 

(नक्की वाचा- - CIDCO Lottery 2025: सिडको माझे पसंतीचे घर सर्वांनाच मिळणार? 26 हजार घरांसाठी किती अर्ज?)

सोलापूर रस्ता - ढोले चौक, सेवन लव्ह चौक, गोळीबार मैदान, मम्मादेवी जंक्शन, भैरोंबाला जंक्शन, रमतेकडी चौक, मगरपट्टा, मुंढवा जंक्शनपासून प्रवेश बंद. 
⁠नरवीर तानाजी मालुसरे रस्ता - राजाराम पुल, कर्वेनगर, आणि डीपी रस्त्यावरून प्रवेश बंद. 
⁠सातारा रस्ता - मार्केट यार्ड, दांडेकर पुल, मित्र मंडळ चौकापासून प्रवेश बंद. 
कोंढवा - NIBM आणि लुल्लानगर चौकातून प्रवेश बंद. 
पौड रस्ता - पौड जंक्शन ते नळस्टॉप आणि एसएनडीटी कॉलेज रस्त्यावर प्रवेश बंद.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: