
रेवती हिंगवे, पुणे
Pune News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळ पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्याच्याबद्दल एक एक करून धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्याआहेत. 'मकोका' कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असूनही तो लंडनला पळून गेल्याची उघड झाली आहे. घायवळ नुसता पळून गेला नाही तर त्याने यासाठी बनावट कागदपत्रे वापरून पासपोर्ट बनवला. यात त्याने आपले नाव 'घायवाळ' ऐवजी 'गायवळ' असे लावून देशाबाहेर पळ काढला. पुणे पोलिसांनी जेव्हा पासपोर्ट विभागाकडे पत्रव्यवहार केला, तेव्हा व्हेरिफिकेशनमध्ये झालेला हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून आला. मात्र, हा सर्व प्रकार राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
निलेश घायवाळने एवढी संपत्ती कशी कमावली?
निलेश घायवाळने एवढी मोठी संपत्ती कमावली कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. घायवाळने धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या मोठ्या कंपनीकडून धमकावून खंडणी गोळा केली. या कंपन्यांचे वार्षिक टर्नओव्हर ₹1000 कोटींपेक्षा जास्त आहे. घायवाळ कंपन्यांकडून आधी "प्रोटेक्शन मनी" म्हणून पैसे उकळायचे आणि त्यातील काही हिस्सा वरदहस्त असलेल्या आमदाराला द्यायचा. जर कोणी विद्यमान आमदाराला विरोध केला, तर घायवाळ हा शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्याकडूनही पैसे वसूल करत असे. ही या गुंडाची संपत्ती कमावण्याची 'स्टाईल' आहे.
(नक्की वाचा- Pune News: कुख्यात गुंड निलेश घायवळवर शिंदे गटाच्या माजी मंत्र्याचा वरदहस्त? तो मंत्री कोण?)
'पृथ्वीराज एंटरप्राइजेस' आणि ड्रायव्हरमार्फत पैशांची देवाणघेवाण
खंडणीचे हे पैसे घायवाळपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची पद्धत वापरली जात होती. जेव्हा रोख रक्कम घेण्यास अडचण निर्माण झाली, तेव्हा "पृथ्वीराज एंटरप्राइजेस" नावाच्या एका फर्मकडून ते पैसे थेट निलेश घायवाळच्या ड्रायव्हरच्या खात्यात किंवा ड्रायव्हरच्या बायकोच्या खात्यात पोहोचवले जात असत.
या सगळ्या व्यवहारावर निलेश घायवाळचा 'राईट हँड' मानला जाणारा विकी चव्हाण लक्ष ठेवत होता. महत्त्वाचे म्हणजे, निलेश घायवाळचा ड्रायव्हर हा मुळशीचा सरपंच निलेश तोंडे असल्याचे समोर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world