जाहिरात

Illegal Bangladeshi Migrants : बांगलादेशींना मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी किती खर्च येतो? कोण करतं मदत?

सध्या बांगलादेशींच्या विरोधात मोठी मोहिम सुरु आहे. पोलिसांकडून संशयितांची कागदपत्रे आणि वास्तव्याचे पुरावे तपासले जातात. यामध्ये जन्माचा दाखला हा भारतीय नागरीकत्वाचा पुरावा मानला जातो.

Illegal Bangladeshi Migrants : बांगलादेशींना मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी किती खर्च येतो? कोण करतं मदत?

अमजद खान, NDTV मराठी

बांगलादेशी नागरिकांची भारतात होणारी घुसखोरी चिंतेचा विषय बनला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात बांगलादेशींना आपलं बस्तान बांधलं आहे. बांगलादेशींची वाढलेली संख्या आता डोकेदुखी बनू लागली आहे. बांगलादेशींचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागाच्या देखील अनेक घटना समोर येत असतात. बांगलादेशी नागरिकांचं बेकायदेशीर स्थलांतर भारताच्या अर्थव्यवस्थेला, राजकारणाला, समाजाला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करत आहेत. त्यामुळे बांगलादेशींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. 

मात्र बांगलादेशी भारतात प्रवेश करतात कसे? त्यांना इथे येण्यास कोण मदत करतात? इथे त्यांची कागदपत्रे कशी तयार केली जातात? त्यांना भारतात पोहोचण्यासाठी नेमका किती खर्च येतो, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बांगलादेशातून भारतात येण्यासाठी किती खर्च येतो?

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातून भारतात प्रवेश करण्याकरीता साधारण 60 ते 90 हजार रुपये खर्च येतो. तेथून मुंबईत येण्साठी 5 ते 7 हजार रुपये इतका खर्च येतो. इथे आल्यानंतर त्यांचे आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे तयार करण्यासाठी 10 हजार रुपये खर्च येतो. हा सगळा खर्च बांगलादेशातून त्यांना भारतात आणणारा एजंट करतो. असेही काही बांगलादेशी महिला-पुरुष आहे जे मजुरीचे काम करतात. काही बांगलादेशी नागरीक चिकन विक्रीच्या व्यवसायातही आहेत. 

(नक्की वाचा- Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला का जात नाहीत? संजय राऊतांचा अजब दावा)

 
सध्या बांगलादेशींच्या विरोधात मोठी मोहिम सुरु आहे. पोलिसांकडून संशयितांची कागदपत्रे आणि वास्तव्याचे पुरावे तपासले जातात. यामध्ये जन्माचा दाखला हा भारतीय नागरीकत्वाचा पुरावा मानला जातो. पोलिसांकडून त्याची तपासणी सुरु आहे. अनेक जण भारतात आल्यानंतर मागच्या तारखेत जन्म दाखला तयार करतात. तसेच आधारकार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड तयार करतात. काही बांगलादेशी पश्चिम बंगालचा दाखला घेऊन येतात. 

(नक्की वाचा-  Railway Budget: अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वेसाठी काय मिळालं? मोठे प्रकल्प मार्गी लागणार का?)

बांगलादेशींना आश्रय दिल्यास कारवाई होणार

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात चाळ परिसरात बांगलादेशींना सहज भाड्याने सहज खोली मिळते.त्यांना घर देणारे चाळ मालक, सोसायटीधारकांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुनच भाडेकरु ठेवला पाहिजे. बांगलादेशीला आसरा दिल्यास घरमालक आणि सोसायटी धारकांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. तसेच हॉटेल, लॉजिंग बोर्डींग आणि बांधकामाच्या ठिकाणी बिल्डरांनी बांगलादेशींना काम दिल्यास त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: