विधानसभा निवडणुकीत महायुती ऐतिहासिक कामगिरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महायुतीचा सत्तास्थापनेच मार्ग मोकळा दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून तशा हालचाली देखील सुरु झाल्या आहेत.
भाजपा विधीमंडळ सदस्य बैठक 25 तारखेस होण्याची शक्यता आहे. तर 26 नोहेंबर रोजी शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतून अंतिम निर्णय आल्यावर याबाबत ठरणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- दरेकर
सध्याच्या स्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. "महायुतीत भाजपच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील", असं भाजप नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्ध पुकारले होते. त्याला जनतेने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहीजे. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत", असं मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
(नक्की वाचा- Maharashtra Election Results 2024 LIVE Updates : जनतेचा कौल कोणाला? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात)
देवेंद्र फडणवीसांच्या बंधुंची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस यांनी म्हटलं की, हा मोठा दिवस आहे आणि या निकालानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. आम्हालाही तसे वाटत आहे.
(नक्की वाचा- Election Results 2024: महाराष्ट्र निवडणूक निकाल : राज्याच्या सत्तेची खुर्ची कोणाला मिळणार? आज होणार फैसला!)
देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेसाठी देखील हालचाली सुरु केल्या आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोन गेला आहे. फडणवीस यांनी रवी राणा यांना तातडीने मुंबई बोलवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सत्ता स्थापनेसाठी इतर आमदारांना देखील देवेंद्र फडणवीसांकडून फोन जात असल्याची माहिती समोर येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world