मावळ तालुक्यामध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. याच शेळकेंचे नातेवाईक अवैध उत्खनन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुनील शेळके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेची महसूल विभागाने गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी चार तहसीलदार आणि दहा तहसील अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले होते. शेळके यांचे नातेवाईक हे नानोली, मावळ येथील वनीकरणाच्या जागेमध्ये विना परवानगी उत्खनन करत असल्याचा आरोप करण्यात येत असून यासाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
नक्की वाचा: पिंपरी-चिंचवडमधील मनपा शाळांच्या वेळेत बदल; कसं असेल नवीन वेळापत्रक?
नातेवाईकांवर आरोप, शेळकेंच्या अडचणीत वाढ
रणजित काकडे यांनी सुनील शेळके यांच्या नातेवाईकांवर हा आरोप केला असून, हा आरोप करत असतानाच त्यांनी एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर करत कशा पद्धतीने उत्खनन करण्यात येत आहे, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. काकडे यांनी हा व्हिडीओ शेअर करताना प्रश्न विचारला आहे की, 'आमदार सुनिल शंकरराव शेळके त्वरित दंडात्मक कारवाई करण्यासाठी पाठपुरवठा करणार का?
नक्की वाचा: महायुतीला 'पवार प्लॅन'चा धक्का? शिंदे-भाजप एकत्र, पण अजित पवारांची नवी खेळी उघड
बावनकुळेंची शेळके यांनी दिशाभूल केल्याचाही आरोप
काकडे यांनी म्हटले की, सुनील शेळके हे आमदार आहेत. त्यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना चुकीची दिली, ज्यानंतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. घटनात्मक पदाचा गैरवापर केला म्हणून आमदार सुनिल शंकरराव शेळके राजीनामा देणार का ? असा सवाल काकडे यांनी विचारला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नातेवाईकांनी वनीकरणासाठीच्या जागेमध्ये केलेल्या अनधिकृत उत्खननप्रकरणी महसूल विभागाने सखोल चौकशी करावी आणि चौकशीअंती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी काकडे यांनी केली आहे. 'प्रभात'ने या संबंधित वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world