
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यापासून या बैठकांना सुरुवात झाली. मंगळवारी दक्षिण मुंबईतील महापालिका मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. मनसेने लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मंगळवारी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि या मतदारसंघातील सगळ्या प्रभागांमध्ये मनसेची राजकीय ताकद किती आहे याची चाचपणी केली. (MNS strategy for the BMC elections 2025) त्या एक ते दोन दिवसांत या आढाव्याचा अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षात काही बदल केले जाण्याचीही शक्यता आहे. एकप्रकारे मनसेच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी अभ्यासाला सुरुवात केली असून तो तपासण्याचे काम राज ठाकरे करणार आहेत.
(नक्की वाचा:'समय बडा बलवान होता है', मनसे-शिवसेना युतीवर राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य)
केंद्रीय समिती अहवाल कधी देणार ? (When will the MNS submit its report on BMC constituencies?)
आगामी निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली असून लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. हा आढावा घेण्यासाठी एक केंद्रीय समिती नेमण्यात आली असून ती हा आढावा घेत आहे. या समितीचा अहवाल तयार झाला असून या समितीची आज शेवटची बैठक झाली. शेवटच्या बैठकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. ही समिती लवकरच आपला अहवाल राज ठाकरेंकडे सोपवणार आहे.
(नक्की वाचा:'मनसेशी युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक, पण राज...' उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं वक्तव्य)
मनसे आढावा का घेत आहे ? (Why is MNS reviewing BMC constituencies?)
समितीने दिलेल्या अहवालानंतर राज ठाकरे त्यानुसार निर्णय घेणार आहेत. प्रत्येक नेत्याला आपल्या विभागातील पक्षाच्या स्थितीचा अभ्यास करून अहवाल तयार करायचा आहे. अभ्यास केल्यानंतर आणि अहवाल सोपवल्यानंतर राज ठाकरे तो सगळा गृहपाठ तपासतील आणि त्यानुसार मुंबईमध्ये काही बदल करायचे असल्यास करतील. हा अहवाल तयार केला जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत अथवा भाजपसोबत जायचे झाल्यास आपण किती जागांवर दावा करू शकतो, आपली ताकद किती मतदारसंघांमध्ये आहे याची चाचपणी केली जात आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या आढाव्याबद्दल बोलताना म्हटले की, "सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन याबद्दलचा अहवाल येत्या एक ते दोन दिवसात राज ठाकरेंना दिला जाईल. सोबतच काही बदल निश्चित केले जातील."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world