जाहिरात

NCB seized 200 crore drugs : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, 200 कोटींचं ड्रग्स जप्त

Mumbai Drugs Seized: एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11.540 किलो उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा, 200 पॅकेट किंवा 5 किलो कॅनॅबिस जप्त केले आहे.

NCB seized 200 crore drugs : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई, 200 कोटींचं ड्रग्स जप्त

पारस दामास, मुंबई

नवी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठी कारवाई केली आहे. 31 जानेवारी रोजी एनसीबीने नवी मुंबईत छापा टाकून 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 4 जणांना अटकही करण्यात आली आहे. आरोपींकडून विविध प्रकारचे ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11.540 किलो उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा, 200 पॅकेट किंवा 5 किलो कॅनॅबिस जप्त केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारीमध्ये 200 ग्रॅम कोकेन जप्त करताना जेव्हा अधिक तपास करण्यात आला तेव्हा अनेक गोष्टी उघड झाल्या. या माहितीच्या आधारे, एनसीबी मुंबई टीमने ही कारवाई केली. 

(नक्की वाचा-  Pregnant Woman Thrown : गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून फेकले, तामिळनाडूतील संतापजनक घटना)

(मुंबई NCB ने जब्त की ड्रग्स)

टेक्नोलॉजी आणि ह्युमन इंटेलिंजन्सच्या माध्यमातून एनसीबीने तस्करीच्या मुळापर्यंत जात या ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश केला आहे. 31 जानेवारी रोजी नवी मुंबईतून पथकाने 11.540 किलो उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा आणि 200 पॅकेट कॅनॅबिस आणि 1 लाख 60 हजार रुपये जप्त केले होते.

(नक्की वाचा- Ratan Tata : रतन टाटांच्या मृत्यूपत्रात 'या' व्यक्तीचं नाव वाचून अनेकजण चकीत, मिळणार जवळपास 500 कोटींची संपत्ती)

परदेशी कनेक्शन

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की हे सिंडिकेट परदेशातील एका गटाकडून चालवले जात आहे. जप्त केलेल्या काही बंदी घातलेले काही ड्रग्स अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले होते. कुरिअर लहान कार्गो सेवा आणि मानवी वाहकांद्वारे भारत आणि परदेशातील विविध रिसिव्हर्सना पाठवले जात होते.  

तस्कर एकमेकांना ओळखतही नव्हते

या प्रकरणात सहभागी असलेले लोक एकमेकांना ओळकतही नव्हते, असेही तपासात समोर आले. हे लोक ड्रग्जची तस्करी करण्यासाठी दररोजच्या संभाषणात खोटी नावे वापरत होती. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: