जाहिरात

Nashik News : जिंदाल कंपनीत अग्नीतांडव; 33 तासांनंतरही धुमसतेय आग, कोट्यवधींचं नुकसान

Jindal Company Fire News : 24 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही आग आटोक्यात नाही.  कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत आहे.

Nashik News : जिंदाल कंपनीत अग्नीतांडव;  33 तासांनंतरही धुमसतेय आग, कोट्यवधींचं नुकसान

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

Nashik News : आशिया खंडातील जिंदाल कंपनीच्या सर्वात मोठ्या युनिटमध्ये अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा भीषण अग्नितांडव बघायला मिळत आहे. कंपनीतील एक-दोन नाही तर 13 लाईनमध्ये आग पसरली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिकच्या जिंदाल कंपनीमध्ये लागलेली आग तब्बल 33 तासानंतही धुमसत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत. आग वाढत असताना कंपनीतील कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. मात्र ऑईलच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर दोन कामगारांचे पाय त्यात भाजले गेले. तात्काळ त्यांना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिसरा कामगार किरकोळ जखमी आहे.

(नक्की वाचा-  नंदुरबारमधील रस्त्यांची दुरावस्था, वऱ्हाडी मंडळींचा नवरा-नवरीला खांद्यावर बसवून प्रवास)

24 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही आग आटोक्यात नाही.  कच्चा माल, केमिकल तसेच प्लास्टिकमुळे आगीचा भडका होत आहे. काही तासांच्या अंतरांनी होणाऱ्या स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.  कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली नाही तर सर्व माल जळून खाक झाल्यास तब्बल साडेसहा हजार कोटीच्या नुकसानीचा अंदाज महाराष्ट्र राज्याच्या उद्योजक सुरक्षा समितीचे सल्लागार शशिकांत जाधव यांनी व्यक्त केला आहे. 

(नक्की वाचा-  Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)

शशिकांत जाधव यांनी याबाबत सांगितलं की. जिंदाल प्लांटमध्ये पॉलिफिल्म, पेट्रोलियम प्रॉडक्ट असल्याने आग भडकतच आहे. कुरकुरे, लेज सारखे जे प्लास्टिक पाकीट आहेत ते आणि इतर सर्व येथे तयार होतात. साडेसात हजार कामगार येथे काम करतात. अग्निशमन आणि सर्व यंत्रणांचे पथक आटोक्यात आणण्याचे काम करत आहेत. पूर्ण कंपनीला आग लागल्यास साडेसहा हजार कोटींचे नुकसान होईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com