जाहिरात

Nandurbar News : नंदुरबारमधील रस्त्यांची दुरावस्था, वऱ्हाडी मंडळींचा नवरा-नवरीला खांद्यावर बसवून प्रवास

Nandurbar News : सातपुड्याच्या डोंगरदऱ्यातील  खुर्चीमाळ चिवलउतार येथील नवरदेवाला नवरीपर्यंत पोहोचण्यासाठी सांगोबारपाडापर्यंत 2 किलोमीटर पायपीट करावी लागली.

Nandurbar News : नंदुरबारमधील रस्त्यांची दुरावस्था, वऱ्हाडी मंडळींचा नवरा-नवरीला खांद्यावर बसवून प्रवास

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

Nandurbar News :  राज्यात एकीकडे विकासाची गंगा वाहत असताना राज्यातील अनेक भाग दुर्लक्षित असल्याचं दिसून येत आहे. नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधांकरता झगडावं लागत आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आजही अनेक गावं आणि पाड्यांना जोडणारे रस्ते नाहीत. यामुळे या ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लग्नासाठी जायचे असो की, रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाणे असो येथील नागरिकांच्या हालअपेष्टा नित्याच्याच आहेत. सध्या सर्वत्र लग्नसराईची मोठी धुम आहे. नवरा-नवरीची एन्ट्री निरनिराळ्या पद्धतीने करण्यासाठी बऱ्याचदा क्रिएटिव्हीटी केली जाते. मात्र नवरदेवाला खांद्यावर उचलून पायपीट करणारी वऱ्हाडी मंडळी नंदुरबारमध्ये आहेत. मात्र त्यांच्यावर ही वेळ केवळ रस्ता नसल्यामुळे आलेली आहे. 

(नक्की वाचा-  Rain Alert : कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?)

nandurbar news

nandurbar news

अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ येथे दोन किलोमीटर रस्ता नसल्याने नवरदेवाला खांद्यावर घेऊन वऱ्हाडी मंडळींना पायपीट करावी लागली. खांद्यावर बसून, भर उन्हात डोंगर दऱ्याचा रस्ता पार करुन वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपात पोहोचले. 

(नक्की वाचा-  Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)

त्यानंतर लग्नविधीचा कार्यक्रम आटोपून पुन्हा नवरा-नवरीला खांद्यावर बसवून वऱ्हाडी मंडळींना पुन्हा त्याच पायवाटेने दोन किलोमीटर अंतर चालून खुर्चीमाळच्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचावं लागलं. 

त्यामुळे नवरदेवासोबत वऱ्हाडी मंडळीची चांगलीच दमछाक झाली. सातपुड्याच्या डोंगर दऱ्यातील ही स्थिती येथील ग्रामस्थांना नवीन नसली तरी आधुनिक युगात येथील ग्रामस्थांची होणारी हेळसांड मात्र मात्र त्यांच्या मनाला चटका देणारी ठरते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com