जाहिरात

Navi Mumbai: 100 मीटरसाठी 4000 रुपयांची वसूली, रुग्णवाहिका आहे की विमान?

वाशी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Navi Mumbai: 100 मीटरसाठी 4000 रुपयांची वसूली, रुग्णवाहिका आहे की विमान?
नवी मुंबई:

राहुल कांबळे

नवी मुंबईतील वाशी परिसरात एका धक्कादायक प्रकाराला उघडकीस आला आहे. फोर्टिस हॉस्पिटल ते नमुपा हॉस्पिटल या अवघ्या 100 मीटरच्या अंतरासाठी रुग्णवाहिकेने तब्बल 4,000 रुपये आकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेचा प्रत्यक्ष वापर न होता, केवळ स्ट्रेचरच्या माध्यमातून रुग्णाला हलवण्यात आलं. तरीदेखील संपूर्ण शुल्क वसूल करण्यात आलं. या प्रकाराने सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

8 जून 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 7.30 ते 8.30 दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी हिमांशू पाटील यांनी वाशी पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल केली आहे. घटनेचा व्हिडीओ पुरावा देखील पोलिसांना सादर करण्यात आला आहे. केवळ स्ट्रेचर वापरून रुग्णाला एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. रुग्णवाहिका प्रत्यक्षात वापरलीच नाही, तरीही चार हजार शुल्क आकारण्यात आलं. ही थेट फसवणूक असून, अशा प्रकरणांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी तक्रारदार पाटील यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Kolhapur news: नग्नावस्थेत स्त्री पुरूषाकडून भरदिवसा अघोरी पूजा, स्मशानभूमीत भानामती- करणीचा थरार

वाशी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सदर व्हिडीओ पुराव्याच्या आधारे संबंधित अ‍ॅम्ब्युलन्स सेवा व हॉस्पिटल प्रशासन यांची चौकशी केली जाईल का, याबाबत आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा प्रकार केवळ एक घटना नसून, नवी मुंबईत अनेक खासगी रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या एजन्सीज अशाच प्रकारे अवास्तव दर आकारत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची अडचणीचा गैरफायदा घेत काही एजन्सीज कशा पद्धतीने लूट करत आहेत. याचं हे आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आजी अन् नातीचं शव, 7 दिवसानंतर ओळख पटली, तो Video...

नागरिकांनी अशा घटनांमध्ये आरोग्य विभाग, आरटीओ आणि महानगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे. खासगी रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या एजन्सीजसाठी दरनिश्चिती आणि किमान सेवा निकष ठरवले जावेत, अशी मागणी सोशल मीडियावरूनही होत आहे. 100 मीटर अंतरासाठी 4000 शुल्क वसूल करून केलेली ही आर्थिक लूट गंभीर असून, पोलिसांनी त्वरीत कारवाई केली नाही, तर अशा प्रकारांना आळा बसणार नाही. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या भावनांशी खेळणाऱ्या एजन्सींवर कठोर उपाययोजना होणं गरजेचं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com