जाहिरात

NDTV Maharashtracha Jahirnama : 'न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून काही होत नाही', संजय राऊतांचं रोखठोक वक्तव्य

Sanjay Raut in NDTV Conclave : न्यायालयाचा दहा वर्षातील अनुभव सांगतो, आम्ही त्यांच्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवू शकत नाही. आपले न्यायधीश फार मोठ्या गप्पा मारतात, तत्वज्ञान शिकवतात. मात्र निवृत्तीनंतर त्यांची भाषणे ऐकण्यासारखी असतात. 

NDTV Maharashtracha Jahirnama : 'न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून काही होत नाही', संजय राऊतांचं रोखठोक वक्तव्य

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्ह याबाबत न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याबद्दल संजय राऊत यांनी न्यायाधीशांवरच निशाणा साधला आहे. ज्या पद्धतीचं कामकाज आम्ही मागील दोन वर्षात पाहिलं आहे, त्यावरुन संजय राऊत यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. NDTV मराठी 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रम संजय राऊत बोलत होते.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संजय राऊत यांनी म्हटलं की, न्यायाधीश पदावर बसलेल्या व्यक्तीने देशाच्या संविधानाच्या घटनेतल्या कलमांचं रक्षण करण्याचं कर्तव्य बजावलं पाहिजे. मात्र अशा प्रकारचं कर्तव्य पार पाडलं गेलं नाही. ज्या संस्था घटनेचं रक्षण करण्यासाठी निष्पक्षपणे काम करण्यासाठी निर्माण झाल्या, त्या पक्षपाती भूमिका घेताना दिसल्या. निवडणूक आयोगाने सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली पक्षपाती भूमिका घेतली. 

(नक्की वाचा-  NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र)

निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्याचा किस्सा सांगताना संजय राऊत यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खटला सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार समोर बसले होते. ज्यांनी पक्षाला जन्म दिला, पक्षाचा बाप समोर हजर आहे. तरीही निवडणूक आयोग सांगतो हा पक्ष तुमचा नाही. हा कोणता कायदा आहे? असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

शिवसेनेसोबतही तसंच झालं. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष (शिवसेना) त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवला. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मात्र निवडणूक आयोग सांगतो हा पक्ष तुमचा नाही. ज्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हाचा हा पक्ष आणि निवडणूक आयोग त्या व्यक्तीला कसा हा पक्ष देतो, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. 

(नक्की वाचा- 'नांदगाव मतदारसंघात कांदेंची दहशत', छगन भुजबळांचा थेट आरोप)

न्यायालयाचा दहा वर्षातील अनुभव सांगतो, आम्ही त्यांच्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवू शकत नाही. आपले न्यायधीश फार मोठ्या गप्पा मारतात, तत्वज्ञान शिकवतात. मात्र निवृत्तीनंतर त्यांची भाषणे ऐकण्यासारखी असतात. जेव्हा तुमच्यासमोर खटला येते, तेव्हा अडीच वर्ष तुम्ही घटनाबाह्य सरकार राज्यात चालू देता. आम्ही तुमच्या समोर घसा कोरडा केला, आमचं म्हणणं मांडलं. आता आम्हाला 19 नोव्हेंबरनंतरची तारीख दिली आहे. आता कसला आला न्याय?  त्या खूर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडून आता काहीच अपेक्षा नाहीत, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, हातातील तलवार काढून संविधान हातात दिलं म्हणजे न्याय मिळतो असं नाही. ती तलवार एकदिवस तुमच्याही डोक्यावर चालणार आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com