जाहिरात

पालघरमध्ये भाजपचा शिवसेनेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ सोडली

पालघरमधील स्थानिक राजकारणात काही गोष्टींमुळे प्रकाश निकम नाराज होते. विशेषतः बंडखोरी करताना पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने निकम नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

पालघरमध्ये भाजपचा शिवसेनेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ सोडली

मनोज सातवी, पालघर

Palghar Political News : पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत मोखाड्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि युवा सेना जिल्हाप्रमुख रिकी रत्नाकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निकम यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील स्थानिक राजकारणात काही गोष्टींमुळे प्रकाश निकम नाराज होते. विशेषतः बंडखोरी करताना पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने निकम नाराज असल्याचे सांगितले जात आहे. याच नाराजीमुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

(नक्की वाचा-  Political news: शिंदे गट ॲपद्वारे 'बोगस मतदारांवर' ठेवणार नजर; शिवसेनेची नवी डिजिटल रणनीती)

या पक्षप्रवेशासोबतच, निकम यांच्यासोबत जव्हार आणि मोखाडा येथील अनेक मोठे नेते, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे पालघर जिल्ह्यात भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.

(नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय?)

या घटनेमुळे, राज्याच्या राजकारणात मित्रपक्षांमध्येही काही प्रमाणात अंतर्गत धुसफूस असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक राजकारणातील गटबाजी आणि नाराजीमुळे एक गट दुसऱ्या गटाची ताकद कमी करत असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले आहे. आगामी काळात या पक्षप्रवेशाचे राजकीय परिणाम काय असतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com