जाहिरात
This Article is From May 11, 2024

एसटी महामंडळाच्या ढिसाळ व्यवस्थापनाने प्रवाशी हैराण, कल्याण डेपोमध्ये नागरिकांचा खोळंबा

प्रवाशी पुणे किंवा कोकणात जाण्यासाठी हौशीने आपल्या परिवारासह निघतात. बॅग घेऊन एसटी आगारात  येताना. कधी एकदाचं गावी पोहचतो अशी त्यांची मानसिकता असते.

एसटी महामंडळाच्या ढिसाळ व्यवस्थापनाने प्रवाशी हैराण, कल्याण डेपोमध्ये नागरिकांचा खोळंबा

उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने अनेकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. गावी जाण्यासाठी उत्साहात निघालेल्या नागरिकांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागत आहे. कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्ये वेळेत बस उपलब्ध नसल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे. नागरिकांना बराच वेळ बस स्थानकांमध्ये वाट पाहत बसावं लागत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रवाशी पुणे किंवा कोकणात जाण्यासाठी हौशीने आपल्या परिवारासह निघतात. बॅग घेऊन एसटी आगारात  येताना. कधी एकदाचं गावी पोहचतो अशी त्यांची मानसिकता असते. मात्र तासन-तास बसची वाट बघून नंतर घरचा रस्ता पकडण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. एसटी महामंडळावर नियोजनाच्या अभावामुळे हे सगळं घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याबाबत प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. 

(नक्की वाचा - माणूस की हैवान! आईसह पत्नीचा खून केला, 3 लेकरांना संपवलं, स्वत: केली आत्महत्या) 

यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र ऑफ द रेकॉर्ड  सांगताना त्यांनी अशोक ले लँड या कंपनीच्या शिवशाही गाड्या संभाजीनगर येथे पाठवल्या असून तिकडच्या टाटा कंपनीच्या गाड्या कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी येथे  पाठवण्यात आल्या आहेत. त्यात अनेक बसच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. मात्र टाटा बसेचे पार्ट मिळत नसल्याची माहिती अधिकारी देत आहेत. 

(नक्की वाचा- डॉक्टर पत्नीला पतीने 2 बॉयफ्रेंड्ससोबत हॉटेलवर रंगेहात पकडलं; तिघांनाही धू-धू धुतलं, VIDEO)

तसेत चालक-वाहक देखील कमी असून देखभाल दुरुस्ती करणारे कर्मचारी देखील अपुरे असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय वाढत्या उष्णतेमुळे गाड्या गरम होऊन ब्रेक डाऊनचे प्रमाण देखील वाढले आहे. या सगळ्या प्रकरणात प्रवाशांना एसटी महामंडळ वेठीस धरत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: