जाहिरात

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कुणाचा विरोध? अजित पवार गटातील दोन नेत्यांची नावं चर्चेत

Maharashtra Political News : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणास ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाच विरोध असल्याचा जोरदार चर्चा आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कुणाचा विरोध? अजित पवार गटातील दोन नेत्यांची नावं चर्चेत

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाचं विलिनीकरणाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून आहे. मात्र ही चर्चा अद्याप पुढे सरकताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावरून अजित पवार गटात मतभेद असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या काही नेत्यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी समर्थन आहे तर दुसरा गटाचा याला विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणास ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाच विरोध असल्याचा जोरदार चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये प्रफुल पटेल यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. अशात दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा आल्यास प्रफुल पटेल यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक आहे. 

(नक्की वाचा-  पुण्यात खळबळ! शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला बेड्या ठोकल्या, रचला होता भयंकर डाव)

प्रफुल पटेल यांच्या जागी सुप्रिया सुळे यांची वर्णी लागू शकते. तर दुसरीकडे जयंत पाटील यांना एकतरी कॅबिनेट मंत्रिपद द्यावे लागेल. जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यास अजित पवार गटातील काही नेत्यांच्या विरोध असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र एकत्र येण्याची प्रक्रिया जर सुरू होत असेल तर जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात घ्यावं, असा एक मतप्रवाह असल्याचे समजते आहे. 

जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात न घेतल्यास पर्याय म्हणून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद द्यावे, असा प्रस्ताव दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र जर तसं झालं तर विद्यमान अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदावर टाच येण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा- ऑपरेशन लग्नकार्य! हुंडा घेणारा कळवा 5000 मिळवा, 'या' राजकीय पक्षाचा भन्नाट उपक्रम)

अजित पवार गटात विलिनीकरणासाठी एका गटाचं समर्थन देखील आहे. मात्र राष्ट्रवादीतील सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या प्रमुख नेत्यांचा विरोध असल्याने तूर्तास विलिनीकरण करण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com