
Mumbai Thane ban on heavy vehicles : मुंबई आणि उपनगरांमधील होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर महिनाभर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे, घोडबंदर रोडपासून शिळफाटापर्यंत दिवसभर अवजड वाहनं बंद करण्यात आली आहेत.
अवजड वाहनांना कुठे असेल बंदी?
१) कोपरी वाहतूक उपविभाग प्रवेश बंद
मुंबई, नवी मुंबईकडून आनंद नगर चेक नाका मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त) वाहनांना कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत आनंद नगर चेक नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
२ कासारवडवली वाहतूक उप विभाग प्रवेश बंद -
मुंबई, विरार वसईहून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना कासारवडवली वाहतूक उप विभागाच्या हद्दीत निरा केंद्र, गायमुख घाट येते 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
नक्की वाचा - ठाणे ते बदलापूर प्रवास आता सुसाट; एकनाथ शिंदेंचा एक निर्णय अन् प्रवाशांमध्ये आनंद
३ वागळे वाहतूक उप विभाग प्रवेश बंद
मुंबईकडूव एल.बी.एस. रोड मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना वागळे वाहतूक उप विभागाच्या हद्दीत मॉडेला चेक नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
४ कळवा वाहतूक उप विभाग प्रवेश बंद
बेलापूर ठाणे रोडने विटावा जकात नाका मार्गे कळव्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी एक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना कळवा वाहतूक उप विभागाच्या हद्दीत विटाया जकात नाका येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे.
5 मुंबा वाहतूक उप विभाग प्रवेश बंद
महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा, (मुंब्रा वाहतूक उपविभाग) येवून ठाणेच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड ( १० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना मुंब्रा वाहतूक उप विभागाच्या हद्दीत पुजा पंजाब हॉटेल, शिळफाटा येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
वाहतूक नियंत्रण अधिसूचना , अवजड वाहनांना प्रवेश बंदीबाबत pic.twitter.com/39J9SmbuGC
— ठाणे पोलीस.. Thane Police (@ThaneCityPolice) September 17, 2025
६ तळोजा नवी मुंबई येथून दहिसर मोरी मार्गे कल्याण फाटा (मुंब्रा वाहतूक उपविभाग) येथून कल्याण व ठाणेच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना मुंबा वाहतूक उप विभागाच्या हद्दीत दहिसर मौरी येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
७ नारपोली वाहतूक उप विभाग प्रवेश बंद
गुजरातकडून चिचोंटी नाका मार्गे नारपोली वाहतूक विभागाच्या हददीत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना नारपोली वाहतूक उप विभागाच्या हददीत ७२ गाळा, चिंचोटी वसई रोड येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
८ भिवंडी वाहतूक उप विषाग प्रवेश बंद
वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना भिवंडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत पारोळ फाटा (नदीनाका) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
९ वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना भिवंडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत धामणगांव, जांबोळी पाईपलाइन नाका आणि चाविंद्रा नराका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
१० कोनगाव वाहतूक उप विभाग प्रवेश बंद
नाशिककडून मुंबईला येणाऱ्या सर्व अवजड (१० चाकी ट्रक व त्यापेक्षा जास्त) वाहनांना कोनगाव वाहतूक उप विभागाच्या हद्दीत बासुरी संदिल (सरवलीगांव) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world