जाहिरात
This Article is From May 02, 2024

'जळगावात वंचितकडून डमी उमेदवार', ठाकरे गट - वंचितमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी!

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि वंचितमध्ये चांगलीच जुंपली आहे.

'जळगावात वंचितकडून डमी उमेदवार', ठाकरे गट - वंचितमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी!
जळगाव:

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि वंचितमध्ये चांगलीच जुंपली आहे. वंचितने मविआमध्ये सामील होण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेहमीच आग्रही होते. वंचित आणि काँग्रेसमधील मतभेद सर्वश्रुत आहेत. आता मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना ठाकरे गट आणि वंचितमध्ये जुपल्याचं दिसून येत आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जात होता. यंदा मविआसोबत फिस्कटल्यानंतर वंचितने आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे मविआला फटका बसू शकतो. दरम्यान काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाकडूनही वंचितवर आरोप केले जात आहेत. 

वंचितचे उमेदवार युवराज जाधव व त्यांचे सूचक व अनुमोदक हे भाजपचे कार्यकर्ते असून महाविकास आघाडीतील मतं फोडण्यासाठी वंचितकडून डमी उमेदवार उतरवण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला आहे. संजय सावंतांच्या आरोपावर वंचितकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. संजय सावंत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून आरोप सिद्ध करा असं आव्हान त्यांनी सावंतांना दिलं आहे. आरोप सिद्ध न केल्यास शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार मागे घ्या असं म्हणत वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांना थेट आव्हान दिलं आहे. 

नक्की वाचा - अहमदनगर मतदारसंघात विखे-शरद पवारांची प्रतीष्ठा पणाला; निलेश लंके सुजय विखेंना धक्का देणार?

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व वंचितमध्ये चांगलीच जुंपली असून भाजपवर आरोप करताना शिवसेना ठाकरे गटाकडून वंचितचे उमेदवार व त्यांचे सूचक अनुमोदक हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने महाविकास आघाडीतील मतं खाण्यासाठी वंचितचा डमी उमेदवार भाजपकडून उभा करण्यात आल्याचा आरोपही संजय सावंत यांनी केला आहे. मात्र संजय सावंत यांनी केलेले आरोप ही बिनबुडाचे असून आपण भाजपचे कार्यकर्ता असल्याचा एकही पुरावा संजय सावंत यांनी सादर करावा आपण आपली उमेदवारी मागे घेणार अन्यथा संजय सावंत यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार मागे घ्यावा असं थेट आवाहन वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांनी संजय सावंत यांना दिले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ आणि ठाकरे गटाकडून करण पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, याशिवाय वंचितकडून करणसिंह संजयसिंह पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com