जाहिरात
Story ProgressBack

अहमदनगर मतदारसंघात विखे-शरद पवारांची प्रतीष्ठा पणाला; निलेश लंके सुजय विखेंना धक्का देणार?

निलेश लंके यांचे विखे कुटुंबासोबत राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे ते सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढवतील हे निश्चित होतं.

Read Time: 3 min
अहमदनगर मतदारसंघात विखे-शरद पवारांची प्रतीष्ठा पणाला; निलेश लंके सुजय विखेंना धक्का देणार?

राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारा जिल्हा अशी अहमदनगरची ओळख आहे. या जिल्ह्यातून अनेक बडे नेते येतात. त्यामुळे येथील निवडणुकांची राज्यभर चर्चा असते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यंदा देखील लक्षवेधी लढत आहे. भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत ही होत आहे. मात्र, ही लढाई केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसून ही लढाई शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब अशी झालीये. विखे विरुद्ध पवार हा संघर्ष आजचा नाही, तर अगदी सुजय विखेंचे आजोबा दिवंगत खासदार बाळासाहेब विखेंपासूनचा आहे.

निलेश लंके यांचे विखे कुटुंबासोबतचे राजकीय वैर देखील सर्वश्रूत आहे. त्यामुळे ते सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढवतील हे निश्चित होतं. मात्र या उमेदवारीबाबत शरद पवारांनी खूप आधीपासून तयारी केलेली होती, असं बोललं जातं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांनी वेळोवेळी विखेंना शह देण्यासाठी नगरच्या राजकारणात विशेष लक्ष घातलेले पाहायला मिळाले. त्यातच यंदाच्या लोकसभेत विद्यमान खासदार सुजय विखेंच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी पवारांनी आधीपासूनच तयारी केल्याचे बोलले जाते. मधल्या काळात निलेश लंके राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले. मात्र तेव्हा देखील आम्हाला पारनेरकडून खूप अपेक्षा आहेत, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं आणि तसंच घडलं. निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले आणि त्यांची उमेदवारी देखील घोषणा झाली.

(नक्की वाचा - रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई)

भाजमधील अंतर्गत कलह

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. या मतदारसंघात 6 पैकी 3 आमदार भाजपचे आहेत. मात्र येथे सुजय विखे पाटील यांना भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसू शकतो. कारण राम शिंदे यांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचं खापर विखे कुटुंबियांवर फोडलं होते. त्यातच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील मागील काही काळात स्थानिक निवडणुकांमध्ये उघडपणे विखे कुटुंबासमोर आव्हान उभं केलं आहे. राम शिंदे आणि कोल्हे कुटुंबियांची या लोकसभा मतदारसंघात चांगली ताकद आहे. त्यामुळे या नेत्यांना सांभाळणे सुजय विखेंसमोरील मोठं आव्हान असेल. राम शिंदे यांच्यासोबतचा वाट मिटला असल्याचं प्रचारादरम्यान तरी दिसून येत आहे. 

सुजय विखे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहे. त्याची माहिती ते आपल्या प्रचारात देते आहे. याशिवाय विखे कुटुंबियांना मानणारा एक निष्ठावंत मतदार आहे. त्याची साथ सुजय विखे यांनी मिळू शकते. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील सुजय विखे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत, ही सुजय विखेंची जमेची बाजू आहे.    

(वाचा - मावळातून श्रीरंग बारणे हॅटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे मशाल पेटवणार?)

निलेश लंकेंची ताकद 

निलेश लंकेंबाबत बोलायचं तर रस्त्यावर उतरुन सर्वसामन्यांमध्ये मिसळून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामांच राज्यभरात कौतुक झालं. आपल्या मतदारसंघातील नागरिकांनासाठी कोरोना महामारीत कोविड सेंटरमध्ये ठाण मांडून होते. याची आठवण अहमदनगरमधील जनतेला आहे. 

विधानसभानिहाय कुणाचं वजन अधिक?

विधानसभा मतदारसंघांचा विचार करायचा तर शेवगावमधू भाजपच्या मोनिका राजळे, अहमदनगर शहरमधून भाजपचे संग्राम जगताप, तर श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत. दुसरीकडे राहुरी येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे, कर्जत जामखेडमधून रोहित पवार आमदार आहेत. तर पारनेरमधून निलेश लंके आमदार होते. मात्र पक्षफुटी आणि गटातटाचं राजकारण याचा फटका कुणाला बसणार यावर बरीच समीकरणं अवलंबून आहेत. अहमदनगरमधील राजकीय सगेसोयऱ्यांची ताकद आणि पाठिंबा हा देखील महत्त्वाच ठरतो. 

अहमदनगर मतदारसंघात एकूण 19 लाख  81 हजार 866 मतदार आहेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टीची युती झाली असून या आघाडीकडून दिलीप खेडकर हे उमेदवार आहे. त्यामुळे ही आघाडी कुणाची मते खाणार यावर देखील विजयी उमेदवाराचे गणित अवलंबून राहणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination