जाहिरात

VIDEO : "माझे 500 रुपये द्या, मग बस सोडा", बस थांबवली नाही म्हणून महिलेचा भररस्त्यात राडा

Nashik News : महिलेने बस चालक आणि वाहक दोघांनाही शिवीगाळ करत आणि कॉलर पकडत, पाठलाग करत असल्याचं दिसत असतानाही बस न थांबवल्याचा जाब विचारला.  

VIDEO : "माझे 500 रुपये द्या, मग बस सोडा", बस थांबवली नाही म्हणून महिलेचा भररस्त्यात राडा

Nashik News : नाशिकमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक धो-धो आलेल्या पावसाने नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्ये वाहतुकीवरही देखील पावसाचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अशा सगळ्या धावपळीत एका महिलेने सिटी लिंक बस थांबवली नाही म्हणून भररस्त्यात रस्त्यात राडा घातला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मुसळधार पावसात पंचवटीतील निमाणी बस स्थानकात बसची वाट पाहत उभी होती. बराच वेळानंतर बस आली मात्र चालकाने बस थांबवलीच नाही. असा या महिलाचा आरोप आहे. महिलेने पाठलाग करुन बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहक आणि चालक या दोघांनी बस थांबवण्याची तसदी घेतली नाही. आपल्यासोबत सहा महिन्यांचं बाळ असताना आपल्याला हा मनस्ताप सहन करावा लागल्याचं महिलेचं म्हणणं आहे. 

रिक्षाने 11 किमी पाठलाग

मात्र तिथेच न थांबत चालक आणि वाहकांना बस का थांबवली नाही? याचा जाब विचारण्यासाठी महिलेने तिथून रिक्षा करुन बसचा पाठलाग केला. पंचवटीतील निमाणी बस स्थानकापासून 11 किलोमीटर बसचा पाठलाग करत महिला नाशिक रोड बस स्थानकात पोहोचली. तिथे महिलेने  वाहक आणि चालक दोघांना धारेवर धरले. 

(नक्की वाचा-  Rain Forecast: मुंबई, पुण्यात आजही धो-धो; 9 जिल्ह्यांना मुळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट')

बस चालक-वाहकाला शिवीगाळ

महिलेने बस चालक आणि वाहक दोघांनाही शिवीगाळ करत आणि कॉलर पकडत, पाठलाग करत असल्याचं दिसत असतानाही बस न थांबवल्याचा जाब विचारला.  मात्र मागे इतर वाहने असल्याने आणि इतर अडचणींमुळे बस थांबवली नसल्याचं दोघांनी सांगितलं. मात्र महिला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. 

(नक्की वाचा - Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय)

महिलेने चालक आणि वाहक दोघांकडेही रिक्षासाठी खर्च केलेल्या 500 रुपयांची मागणी केली. 500 रुपये द्या आणि मगच गाडी सोडा, असं म्हणत ही महिला बससमोर उभी राहिली. नाशिकच्या सिटी लिंक बसच्या इतर कर्मचाऱ्यांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. मात्र आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाहक आणि चालकांवर प्रशासनाकडून काही कारवाई होणार का? की महिलेने शिवीगाळ करून मारहाणीचा प्रयत्न केला म्हणून तिच्यावर कारवाई होणार? हे पाहावं लागेल.

पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com