जाहिरात
This Article is From Apr 21, 2024

T-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी मी 100 टक्के तयार, पण... : दिनेश कार्तिकचं महत्वाचं विधान

RCB चा संघ आयपीएलमध्ये आपली छाप पाडू शकला नसला तरीही दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) फलंदाजीत आपली छाप पाडली आहे.

T-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी मी 100 टक्के तयार, पण... : दिनेश कार्तिकचं महत्वाचं विधान
मुंबई:

सध्या भारताचे सर्व खेळाडू हे आयपीएलच्या सतराव्या हंगामामध्ये व्यस्त आहेत. परंतु आयपीएल आटोपल्यानंतर भारतीय संघासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे T-20 वर्ल्डकपचं. जुन महिन्यापासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाची सध्याची अवस्था पाहता T-20 वर्ल्डकपमध्ये कोणाला स्थान मिळणार ही उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. त्यातच दुखापतीमधून सावरलेला ऋषभ पंत अद्याप म्हणावा तसा फॉर्मात आलेला नाहीये. त्यामुळे भारतीय संघात फिनीशरची भूमिका कोण बजावणार हा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

RCB चा संघ कोमात पण दिनेश कार्तिकने छाप पाडली -

यंदाच्या आयपीएल हंगामात फाफ डु-प्लेसिसचा RCB संघ म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाहीये. अवघ्या एका विजयासह RCB चा संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने फलंदाजीत आपली चमक दाखवली आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात 23 बॉलमध्ये 53 रन्सची खेळी केल्यानंतर रोहित शर्माने मैदानावरच दिनेश कार्तिकची चेष्टा करताना, शाबास डीके ! T20 वर्ल्डकपमध्ये निवडीसाठी तुझं नाव द्यायचा प्रयत्न करतोय. याच्या डोक्यात वर्ल्डकप सुरु आहे असं विधान केलं होतं.

दिनेश कार्तिकने फलंदाजीत आपलं नाणं खणखणीत वाजवंल -

मुंबईविरुद्धचा सामना झाल्यानंतरही दिनेश कार्तिकने हैदराबादविरुद्ध सामन्यात 287 धावांचा पाठलाग करताना RCB कडून कमालीची खेळी केली होती. KKR विरुद्ध सामन्यातही दिनेश कार्तिकची बॅट चांगली चालली.

मी भारताचं प्रतिनिधीत्व करायला 100 टक्के तयार -

माझ्या आयुष्यात आता या क्षणाला भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करायची संधी मिळणं हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असेल. मी भारतीय संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. T-20 वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायची संधी मिळणं यापेक्षा मोठं काहीच नसेल.

परंतु मला असं वाटतं की सध्या तीन शांत आणि संयमी माणसं आहेत, त्यांच्या विचार करण्यावर भारतीय संघासाठी चांगलं काय असेल हे ठरेल. ती माणसं म्हणजे रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड. मी नेहमी त्यांच्यासोबत असेन आणि ते जे काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मी इतकच सांगेन की भारतीय संघाकडून खेळण्यासाठी मी 100 टक्के तयार आहे आणि वर्ल्डकपसाठीचं विमान पकडायला मी काहीही करायला तयार आहे, असं कार्तिकने स्पष्ट केलं.

हे ही वाचा - एका मोठा खेळाडू होणार आऊट! पाहा कशी असेल वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कोण आहेत शर्यतीत?

सध्याच्या घडीला भारताच्या T20 संघात स्थान मिळवण्यासाठी ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन, लोकेश राहुल हे चार यष्टीरक्षक फलंदाज शर्यतीत आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या फ्लाईटमध्ये कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
    

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
IND vs NZ : पुन्हा पराभवाचं सावट, टीम इंडियावर 12 वर्षांनी येणार नको ती वेळ?
T-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी मी 100 टक्के तयार, पण... : दिनेश कार्तिकचं महत्वाचं विधान
t20-world-cup-2024 india australia engalnd west indies these four teams will semi finalists sunil gavaskar prediction
Next Article
टी 20 विश्वचषक सेमी फायनलमध्ये हे 4 संघ पोहोचतील; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी