
शुभम बायस्कार
प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कॅम्प मार्गावरील नेक्स्ट लेवल मॉलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. स्पा 99 या सेंटरमध्ये मसाज थेरीपीच्या नावावर चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी येथे धाड टाकली. त्यात तीन मुली, स्पा सेंटरचा व्यवस्थापक व दोन ग्राहकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शहराच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात येणाऱ्या कॅम्प मार्गावर नेक्स्ट लेवल मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर स्पा 99 नावाचे मशाज सेंटर आहे. या सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मसाज थेरेपीच्या नावावर चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाचा पोलिसांनी आज भांडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने बुधवारी सायंकाळी स्पा 99 या सेंटरवर धाड टाकत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. दरम्यान मसाज सेंटरचा व्यवस्थापक गोपी निरजसिंग भवरसिंग पंड्यायाला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.
ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच', मीरारोडचा वाद चिघळणार?
पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल, रोख असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्पा सेंटर चालवणारा गोपी निरजसिंग भवरसिंग पंड्या याला पोलिसांनी विचारपूस केली असता, स्पा सेंटरचे मालक राकेश रावल हे असल्याचे सांगितले. ते मुळचे मध्यप्रदेशचे आहेत. तर दुकानाचा मालक अभिजीत दिलीप लोखंडे हा अमरावतीचा आहे. हे दोघे मिळून हा स्पा चालवत होते.
त्यामुळे पोलिसांनी स्पा सेंटरचा व्यवस्थापक गोपी निरजसिंग भवरसिंग पंड्या, स्पा सेंटरचा मालक राकेश रावल तर दुकान मालक अभिजीत दिलीप लोखंडे या तिघाविरुद्ध गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमरावतीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कारवाई संदर्भात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world