बदलापुरात (Badlapur Child abuse) ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला ती शाळा मंगळवारपासून बंदच असून आठवडाभर ही शाळा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र मोठं शैक्षणिक नुकसान होत असून शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
बदलापूर शहरात असलेल्या या शाळेत 10 हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थी शिकत असून शाळेत शिशु वर्गापासून ते डिग्री कॉलेजपर्यंतचं शिक्षण दिलं जातं. फक्त बदलापूरच नव्हे, तर आजूबाजूच्या शहरातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या शाळा आणि कॉलेजमध्ये येत असतात. मात्र मंगळवारी शाळेबाहेर झालेल्या आंदोलनानंतर ही शाळा बंदच असून पुढील मंगळवारपर्यंत, म्हणजे आठवडाभर ही शाळा बंद राहणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. एकीकडे शाळेची झालेली तोडफोड पाहता विद्यार्थी आणि पालकांमध्ये हळहळ होत असून दुसरीकडे शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचंही विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा - आश्रमात ठरतेय मुलींच्या शरीराची किंमत, पश्चिम महाराष्ट्रात दिवसाढवळ्या घडत होतं घृणास्पद कृत्य!
शाळेत घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील या विद्यार्थ्यांनी पालकांनी केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world