
विनोद जीरे, प्रतिनिधी
Beed Abduction Case : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे जुन्या वादातून एका तरुणासह त्याच्या आईचे अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा दादासाहेब घोडके असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, अज्ञात व्यक्तींनी कृष्णा आणि त्यांच्या आईचे प्रथम अपहरण केले. त्यानंतर त्यांना अज्ञात स्थळी नेऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीत कृष्णा यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत, ज्याचे दृश्य विचलित करणारे आहे.
( नक्की वाचा : Beed News : बीडमध्ये नीट परीक्षेचा बाजार, 22 लाख उकळले! रेट कार्ड उघड )
या गंभीर घटनेची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, घटनेला काही तास उलटूनही अद्याप आरोपी फरार आहेत. यामुळे पीडित कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पीडित कुटुंबांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाला या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.
( नक्की वाचा : Dhananjay Munde ... त्याशिवाय 2 मुलांना जन्म शक्य नाही! धनंजय मुंडेंना कोर्टाचा पुन्हा धक्का )
बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याच्या घटनांमध्ये ही आणखी एक भर पडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून पीडितांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world