जाहिरात

Beed News : बीडमध्ये नीट परीक्षेचा बाजार, 22 लाख उकळले! रेट कार्ड झालं उघड

Beed NEET Scam : बीड जिल्हा सध्या वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्यात चर्चेत आहे. गुन्हेगारी घटणांची ही कीड शैक्षणिक क्षेत्रापर्यंत पसरली आहे.

Beed News : बीडमध्ये नीट परीक्षेचा बाजार, 22 लाख उकळले! रेट कार्ड झालं उघड
बीड:

विनोद जिरे, प्रतिनिधी

Beed NEET Scam : बीड जिल्हा सध्या वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्यात चर्चेत आहे. गुन्हेगारी घटणांची ही कीड शैक्षणिक क्षेत्रापर्यंत पसरली आहे.  बीडमध्ये नीट परीक्षेचा जणूकाही बाजार मांडलाय की काय ? असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार समोर आलाय. त्याचबरोबर नीट परीक्षेत मार्क वाढवून देणारे रॅकेट सक्रिय असल्याचं देखील बोलले जात आहे..विशेष म्हणजे नीट परीक्षेत 600 मार्क मिळवून देण्यासाठी तब्बल 55 लाख रुपये रेट असल्याचं देखील बोललं जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

तुमच्या मुलीला नीट परीक्षेत 600 पेक्षा जास्त मार्क मिळवून देतो, असे म्हणत बीडमधील तिघांनी पालकांची 22 लाख रुपयांची फसवणूक केलीय..पालकांनी तक्रार दिल्यानंतर बीडच्या शिवाजी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंचफुला मधुकर जगताप, मधुकर जगताप, उद्धव शंकरराव राऊत तिघेही राहणार बीड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

( नक्की वाचा : Dhananjay Munde ... त्याशिवाय 2 मुलांना जन्म शक्य नाही! धनंजय मुंडेंना कोर्टाचा पुन्हा धक्का )

या तिघांनी बीडमधील बस वाहकाच्या मुलीला नीट परीक्षेमध्ये 600 पेक्षा जास्त मार्क्स मिळवून देऊन एमबीबीएसला नंबर लावून देतो, असं आमिष दाखवलं होतं. त्यासाठी 55 लाख रुपये मागितले होते. त्यातील 22 लाख रुपये त्यांना देण्यात आले. फेब्रुवारी आणि एप्रिल 2024 मध्ये हा प्रकार घडला.  

( नक्की वाचा : बीड जिल्ह्यात काय चाललंय? पुरुषांना नको झालंय आयुष्य, वर्षभरातील आकडेवारी वाचून बसेल धक्का )

परंतु निकालानंतर मुलीला कमी मार्क आल्याचे पाहून या पालकांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली, परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळे तिडके या  महिलेने शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: