जाहिरात

Buldhana News : बायकोच्या 'त्या' एका वाक्यानं संतापला नवरा...पत्नीची केली हत्या, 7 महिन्याची चिमुकली पोरकी!

Buldhana News : पतीच्या अपमानाचा राग इतका टोकाला गेला की त्याने गाढ झोपेत असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली.

Buldhana News : बायकोच्या 'त्या' एका वाक्यानं संतापला नवरा...पत्नीची केली हत्या, 7 महिन्याची चिमुकली पोरकी!
Buldhana News : या घटनेनंतर आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बुलडाणा:

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : क्षुल्लक कारणांवरून संताप व्यक्त करण्याची आणि संयम गमावण्याची प्रवृत्ती हल्ली वाढत चालली आहे, ज्यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. वाढत्या चिडचिडीमुळे नात्यांमधील भान हरवत चालले असून, अशा घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ठरत आहेत. छोट्या गोष्टींवरून संताप व्यक्त करण्याऐवजी तरुण पिढीने संयम बाळगणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक गावात एका कौटुंबिक वादातून मोठा अनर्थ घडला. पतीच्या अपमानाचा राग इतका टोकाला गेला की त्याने गाढ झोपेत असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. मृत महिलेचे नाव लक्ष्मी पवन धुंदाळे (वय वर्ष 24) असे आहे. ही हृदयद्रावक घटना 07 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

अपमानाचा बदला

प्राथमिक माहितीनुसार,पत्नी लक्ष्मीने तिचा पती पवन गजानन धुंदाळे (वय वर्ष 28) याला उद्देशून "तू काही कामाचा नाहीस, बाहेर जा आणि मरून जा," असे शब्द वापरून अपमानित केले होते. याच अपमानाचा राग मनात ठेवून पवनने मध्यरात्री, लक्ष्मी घरात शांतपणे झोपलेली असताना, तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या मारहाणीत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. एका क्षणात संसाराची राखरांगोळी झाली. आरोपी पवन आणि मृत लक्ष्मी हे दोघेही शेतमजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

( नक्की वाचा : Pune News : बस स्टॉपवर केली मैत्री आणि शाळेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर... संतापजनक घटनेनं पुणे हादरलं! )

निष्पाप चिमुकलीचे हाल

या दुर्दैवी दांपत्याला अवघ्या 7 महिन्यांची एक चिमुकली मुलगी आहे. या क्रूर घटनेमुळे त्या निष्पाप बाळाचे मातृछत्र हरपले आहे. ज्या वयात आईचा आधार हवा असतो, त्याच वयात बाळ पोरके झाले. "या कोवळ्या जीवाचा काय दोष?" असा हृदयद्रावक सवाल सध्या गावात आणि परिसरात जनमानसातून उपस्थित केला जात आहे, ज्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वाद किती टोकाचे रूप घेऊ शकतो, याचे हे एक जिवंत उदाहरण ठरले आहे.

घटना घडल्यानंतर आरोपीचे आई-वडील घाबरून घराबाहेर पडले आणि त्यांनी थेट ग्राम पोलीस पाटील संदीप सदाशिव गटमने यांच्या घरी धाव घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस पाटलांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याला कळविले.त्यानंतर पोलिसांनी आरोपी पवन धुंडाळेला अटक करण्यात आली. 

( नक्की वाचा : विवाहित पुरुषासोबत सुरु होता रोमान्स, अचानक आली पत्नी ! 10 व्या मजल्याच्या खिडकीत लटकली गर्लफ्रेंड, पाहा VIDEO )

आरोपी पवनला सोमवारी ( 08 डिसेंबर ) जळगाव जामोद न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com