जाहिरात

दिलीप खेडकर लाच प्रकरण : रामदास कदमांनी दाखवलं आदित्य ठाकरेंकडं बोट

Puja Khedkar : ट्रेनी आयएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर लाच प्रकरणात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंकडं बोट दाखवलंय.

दिलीप खेडकर लाच प्रकरण : रामदास कदमांनी दाखवलं आदित्य ठाकरेंकडं बोट
Dilip Khedkar Aaditya Thackeray Ramdas Kadam
मुंबई:

ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाला आता राजकीय वळण येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी तत्कालीन मंत्र्याला 2 कोटींची लाच दिली होती, असा आरोप या प्रकरणातील तक्रारदार तानाजी गंभीरे यांनी केलाय. गंभीरे यांनी प्रकरणात माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपानंतर कदम यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये या आरोपांना उत्तर दिलंय. कदम यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आदित्य ठाकरेंकडं बोट दाखवलंय. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले कदम?

'मी गंभीरे यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेवून कारवाई करणार आहे. बदल्यांचे अधिकार हे महामंडळाचे असतात. यामध्ये माझे नाव आहे. मात्र 2019 नंतर पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांचं नाव आहे. ही माझी बदनामी आहे याविरोधात न्यायलयात जाणार आहे. माझी एसीबी चौकशी होण्याचा काही संबधच नाही. 

'माझी कारकिर्द 2019 ला संपली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मंत्री केले. या प्रकरणाचा दिपक केसरकरांचाही कोणता संबंध नाही. ही डील झाले हे त्यांच्या स्वप्नात आलं होतं का? यात माझं नाव आहे, केसरकरांचे नाव आहे, आदित्य ठाकरेंचे नाव नाही म्हणून हे राजकीय आरोप आहेत. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांचे देखील नाव नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्या वकिलांचीही चौकशी व्हावी,' अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. 

( नक्की वाचा : IAS पूजा खेडकरांना दणका, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली मोठी कारवाई )

गंभीरे यांचे आरोप काय?

दिलीप खेडेकर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला असताना त्यांना वेगव्ेगळ्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. ते निलंबित होते. त्यानंतरही त्यांना चार्ज देण्यात आला. कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हा अधिकारी इतकं मोठं बेकायदेशीर कृत्य करु शकत नाही, असा दावा गंभीरे यांनी केला. 

रामदास कदमांच्या वरदहस्तामुळे दिलीप खेडकरांना पद मिळाल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय. पद देण्यासाठी तत्कालीन मंत्र्याने 2 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये गंभीरे यांनी हे आरोप केले होते. त्या आरोपाला उत्तर देताना रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंकडं बोट दाखवल्यानं या प्रकरणाला नवं राजकीय वळण आलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com